आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेनेरिक औषधींच्या अॅपचे विक्रमी डाऊनलोडिंग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- गेल्या दोन आठवड्यांत हेल्थकार्ट प्लस या अॅप्लिकेशनचे दोन लाख एवढे डाऊनलोडिंग झाल्याचे दिसून आले आहे. अँड्रॉइड आणि आयओएस युजरकडून त्याचा अधिक वापर केला जात आहे.

अॅपलच्या अॅप स्टोरमध्ये हेल्थकार्ट प्लस हे अॅप गेल्या महिन्यात आघाडीच्या तीनमध्ये समाविष्ट होते. हेल्थकार्ट प्लसला प्रचंड मागणी वाढली आहे. 25 देशांत हेल्थकार्ट अव्वल मेडिकल अॅप ठरले आहे. गेल्या दोन आठवड्यांत म्हणूनच त्याचे 2 लाख डाऊनलोड्स झाले. त्याचे लाँचिंग गेल्या वर्षी एप्रिलमध्ये झाले. त्यानंतर चांगला प्रतिसाद मिळाल्याचे हेल्थकार्ट प्लसचे सहसंस्थापक प्रशांत टंडन यांनी सांगितले. गेल्या महिन्यापासून लाखो युजरकडून अॅपच्या पेजला भेट दिल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली. काही युजरनी या अॅपबद्दलचा संदेश व्हॉट्सअपवर पाठवला. त्यामुळे अॅपची माहिती सर्वदूर पोहोचली. त्यानंतर लोकांनी अँपच्या पेजला तपासण्यास सुरुवात केली. त्यातून अँपची लोकप्रियता वाढल्याचे दिसून आले आहे, असे टंडन म्हणाले.

नेमके कामाचे स्वरूप काय?
डॉक्टरांनी सुचवलेल्या औषधीला जेनेरिक पर्याय शोधून देण्याचे महत्त्वाचे काम हे अॅप करते. भारतातील पहिले परिपूर्ण औषधी सर्च इंजिन म्हणून हेल्थकार्ट प्लसकडे पाहिले जाते. स्वस्त आणि योग्य घटक असलेले औषध शोधून देण्याचे काम या अँपने सहज होऊ शकते.

लवकरच प्रादेशिक भाषेत
हेल्थकार्ट प्लस प्रादेशिक भाषांतून उपलब्ध करून देण्याची कंपनीची योजना आहे. सध्या हेल्थकार्ट इंग्लिश आणि हिंदीमधून माहिती देते.