आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेनेरिक औषधांचा देशभरात तुटवडा, कंपन्यांना मोठा फायदा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- ब्रँडेड औषधांच्या नावावर रुग्णांची मोठ्या प्रमाणात होणारी आर्थिक लूट थांबविण्यासाठी मोदी सरकारने ‘जेनेरिक औषधी’ लोकांपर्यंत पोहोचवण्याचा घेतलेला निर्णय फक्त प्रसिद्धीपुरताच मर्यादित राहिला आहे. प्रारंभी सहज मिळणाऱ्या औषधांचा फायदा खासगी कंपन्यांना पोहोचविण्यासाठी सरकारने गेल्या चार महिन्यांपासून वितरण थांबविले अाहे. त्यामुळे रुग्णांची अडचण वाढली आहे.

पुढच्या चार वर्षात गावागावांत जेनेरिक औषधे पोहोचवू, अशी घोषणा केंद्रीय रसायन राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केली होती. मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर पहिल्या सहा महिन्यांत जेनेरिक औषधींचा आकडा ५०४ वर नेण्यात आला. वर्षाअखेर एक हजारांवर जेनेरिक औषधी उपलब्ध करण्यात येतील. त्यात कर्करोग, क्षयरोग आदी रोगांवरील औषधी ८० ते ९० टक्के कमी किमतीमध्ये उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र सरकारचा ५०४ औषधांचा आकडाही दिशाभूल करणारा आहे. सध्या दुकानांत फक्त १५० ते १९० प्रकारच्या औषधीच उपलब्ध होत आहेत. म्हणजेच डॉ. मनमोहनसिंग यांच्या सरकारच्या वेळची स्थितीही कायम आहे.

घोषणा १४०० दुकानांची, देशात फक्त १०७ :
अहीर ‍आणि इंडियन मेडिकल असोसएशनने (आयएमए) ५ जून २०१५ रोजी दिल्लीत जेनेरिक औषधांचे दुकान सुरू करताना १५ ऑगस्ट २०१५ पर्यंत देशभरात आयएमएच्या १४०० शाखांमध्ये दुकान सुरू हाेईल,अशी घोषणा केली होती. परंतु दिल्ली वगळता एकाही ठिकाणी दुकान सुरू झालेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १४ ऑगस्ट २०१५ राेजी जेनेरिक अाैषधी अभियानाचा शुभारंभ करणार हाेते. या िदवशी देशभरात तीन हजार दुकाने सुरू करण्यात येणार हाेती. परंतु शुभारंभच झाला नाही. अाज देशभर जेनेरिक अाैषधांची अधिकृत दुकाने केवळ १०७ अाहेत. अहीर यांनी २०१९ पर्यंत ५० हजार जेनेरिक अाैषधांची दुकाने उघडण्याची आणि प्रत्येक दुकानाला १ लाख रुपयांची माेफत अाैषधे देण्याची घाेषणा केली अाहे. वर्ष उलटूनही त्यात जराही प्रगती नाही.

सरकार- खासगी कंपन्यांची हातमिळवणी :
माेदी सरकार जेनेरिक अाैषधी िकती स्वस्त उपलब्ध करून देत अाहे याबाबत अहीर यांनी काही उदाहरणे िदली. त्यानुसार एम्लाेिडपाईन १० गाेळ्या २० रुपयास िमळतात त्या जेनेरिकमध्ये केवळ अडीच रुपयांत िमळत अाहेत. वेदनाशमक गाेळ्या ३० रुपयांऐवजी ५ रुपयांत, रक्तदाबावरील गाेळ्या ९४ रुपयांऐवजी १० रुपयांत, तापावरील गाेळ्या ४२ रुपयांऐवजी साडेतीन रुपयात, मधुमेहावरील गाेळ्या ६६ रुपयांऐवजी केवळ तीन रुपयांत, प्रतिजैविके १५० रुपयांऐवजी ४१ रुपयांत उपलब्ध हाेत अाहे. सरकारच्या मुबलक प्रसिद्धीमुळे रुग्ण जेनेरिक अाैषधांच्या दुकानात जायला लागले. प्रारंभी त्यांना अाैषधी िमळायला लागल्या. त्यामुळे खासगी कंपन्यांचे माेठे नुकसान व्हायला लागले.सध्या ५०४ अाैषधांऐवजी केवळ १५० अाैषधींचा पुरवठा होत आहे. दुकानदारांनी मात्र सरकार आणि खासगी कंपन्या यांच्यात हातमिळवणी असल्याचा अाराेप केला अाहे. तुटवडा नाही. दुकानदारांकडून अाैषधीची मागणीच हाेत नाही.
- एम.डी. श्रीकुमार, सीईओ, जनऔषधी विभाग

कॅल्शियम, लोहाच्या गोळ्या मिळेनात
दिल्लीतील दुकानांत गेले तीन महिने कॅल्शियम, अायर्नच्या गोळ्याच उपलब्ध नाहीत. सातत्याने पाठपुरावा करूनही सरकारकडून त्या उपलब्ध हाेत नसल्याची माहिती िदल्लीतील दुकानांमधून िमळाली. अाम्हीच अाैषधी निर्मिती करू. तेव्हा सगळे सुरळीत हाेईल.
- हंसराज अहिर, केंद्रीय रसायन राज्यमंत्री