आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्लिक करा आणि परिसरातील पुराची माहिती मिळवा!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - तुमच्या परिसरात पूर कोठे येणार आहे, याची माहिती आता एका क्लिकवर मिळवणे शक्य होणार आहे. केवळ वेबसाइटला लॉग ऑन केल्यानंतर ही माहिती मिळेल.

केंद्रीय जल आयोगाने (सीडब्ल्यूसी) एक वेब पोर्टल तयार केले आहे. पुराचे भाकीत, ट्रेंड, इशारा इत्यादी माहिती यावरून सहजपणे मिळेल. www.india-water.gov.in/ffs हा संकेतस्थळाचा पत्ता आहे. विविध राज्यांना जोडणार्‍या नद्यांचे पात्र त्याचबरोबर देशातील पुराचे भाकीत करणारी 175 केंद्रे यांचीही माहिती त्यावर देण्यात आली आहे. देशातील विविध नद्या आणि त्यांचे जाळे याबद्दलचा तपशील संकेतस्थळावर आहे. पोर्टलवर पाण्याची पातळी दर्शवण्यासाठी रंगांचाही वापर करण्यात आला आहे. हिरवा रंग पाण्याची पातळी खाली, पिवळा मध्यम पातळी, तर लाल रंग अर्थातच मोठ्या पुराचा धोका सांगणारा आहे .

एसएमएस सेवाही : पुराचे भाकीत सांगणारे एसएमएस मोबाइलवर देण्याची व्यवस्था यात आहे. त्यामुळे काही धोका दिसल्यानंतर त्याची पूर्वकल्पना एकाच वेळी हजारो लोकांना देण्याची सोय यात आहे.

(डेमो पिक)