आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार डॉक्युमेंट्स दिल्यास एका आठवड्यात मिळेल पासपोर्ट - सुषमा स्वराज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - विदेशात जाण्याची इच्छा असलेल्यांसाठी आता पासपोर्ट मिळण्याची पद्धती सोपी झाली आहे. सर्वसामान्य श्रेणीतील पासपोर्ट आता एका आठवड्यात मिळणार आहे. त्यासाठी कागदपत्रांची मोठी जंत्री करण्याचीही गरज नाही. फक्त चार डॉक्यूमेंट्स तुम्हाला द्यावे लागणार आहे. त्यात आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड आणि एक प्रतिज्ञापत्रचा समावेश असेल. परराष्‍ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सोमवारी (ता.25 ) याबाबत माहिती दिली. .
पासपोर्टच्या कोणत्या नियमात बदल झाला?
- नव्या नियमानुसार, तीन कागदपत्रांव्यतिरिक्त फॉर्मेट अॅनेक्सचर 1 बरोबर एक प्रतिज्ञापत्र द्यावे लागेल.
- प्रतिज्ञापत्रात नागरिकत्व आणि कौटुंबिक तपशील द्यावे लागेतील. तसेच अर्जदारास त्यात गुन्हेगारी पार्श्‍वभूमी नसल्याचे नमूद करावे लागेल.
- पूर्वी पासपोर्ट मिळण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागत होता.
या गोष्‍टींकडे लक्ष द्या...
- सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे, आता पोलिस व्हेरिफीकेशन पासपोर्ट मिळाल्यानंतर होईल. जर काही चुकीचे आढळले तर पासपोर्ट रद्द केला जाईल.
- पासपोर्ट कार्यालय आधार क्रमांकाची पडताळणी ऑनलाइन करेल.
- यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
- मतदान ओळखपत्र आणि पॅनकार्ड पडताळणी डाटाबेसच्या माध्‍यमातून पूर्ण होईल.
- ही सर्व प्रक्रिया पासपोर्टसाठी अर्ज मंजूर होण्‍यापूर्वी होईल.
सहज होणार पडताळणी
- परराष्‍ट्र मंत्रालयातील पासपोर्ट विभागाचे संचालक अनिलकुमार यांनी सांगितले, की आता आमच्या सिस्टिममध्‍ये अनेक चेक पॉइंट्स आहे. येथे सादर केलेल्या खोट्या कागदपत्रांची माहिती लगेच होऊ शकते.
- आधार डाटाबेसशी जोडले गेले आहे. पडताळणी करताना अडचण येणार नाही.
- केंद्र सरकार ओळखपत्र आणि पॅन कार्ड एकमेंकांशी जोडण्‍यासंदर्भात काम करत आहे.
- जर काही गडबड झाली तर पासपोर्ट रद्द करणे आणि परत घेण्‍याचीही व्यवस्था असेल.
सुषमा स्वराज यांनी ट्विट करुन 3 टप्प्यांमधून समजवले
1. जर तुम्ही आधार, मतदान ओळखपत्र आणि पॅनकार्ड व्यतिरिक्त गुन्हेगार रेकॉर्ड नसल्याचे प्रतिज्ञापत्र दिल्यास आम्ही तुम्हाला पासपोर्ट जारी करु.
2. तुमचे पोलिस व्हेरिफीकेशन नंतर होईल.
3. तुम्ही पासपोर्टशी संलग्न सेवांसाठी कोणतेही पाच उपलब्ध तारखांपैकी कोणतीही निवडू शकता.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, परराष्‍ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे ट्विट..