नवी दिल्ली - डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरनंतर आता थेट घरपोच लाभ योजनेवर केंद्र सरकारने लक्ष केंद्रित केले आहे. यामुळे निवृत्तिवेतन, स्कॉलरशिप, सरकारी मानधन, मातृत्व लाभ अशा योजनांची रक्कम लाभार्थींना घरबसल्या मिळेल. निवृत्तिवेतन व शिष्यवृत्तीधारकांच्या थेट हातात रक्कम पडावी हा हेतू यामागे असल्याचे केंद्रीय ग्रामविकास मंत्री जयराम रमेश म्हणाले. आता संबंधितांच्या खात्यात रक्कम जमा होण्याऐवजी मायक्रो एटीएम, मोबाइल कनेक्टिव्हिटी किंवा आधुनिक तंत्राद्वारे त्यांच्या हातात मिळू शकेल. योजनेला दोन वर्षे लागतील.
योजनेची वैशिष्ट्ये
०आंध्र प्रदेशात योजना सध्या सुरू. झारखंडसह इतर राज्यांत लवकरच.
०लाभार्थींच्या बँक खात्यात रक्कम जमा होणार नाही. मायक्रो एटीएम, मोबाइल कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून संबंधितांच्या हातात रक्कम पडणार आहे.