आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Giriraj Cried Out After Modi Slam Him On Controversial Statement

मोदींनी फटकारल्याने गिरिराज ढसाढसा रडले, गिरीराज यांचा मात्र इन्कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सोनिया गांधी यांच्यावरील वादग्रस्त टिप्पणी केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना चांगलीच महागात पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फटकारल्यानंतर मंगळवारी गिरिराज संसदेच्या गॅलरीत ढसाढसा रडले. मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी त्यांना सांभाळले. हे वृत्त माध्यमांपर्यंत पोहोचले तेव्हा सिंह यांनी पंतप्रधानांशी भेट झाल्याचा स्पष्ट शब्दांत इन्कार केला.
‘कोणी मला रडताना पाहिले आहे का? मीडिया महाभारतातील संजय आहे का?’ असे प्रतिप्रश्नच त्यांनी विचारले. ‘राजीव गांधी यांनी एखाद्या नायजेरियन महिलेशी विवाह केला असता तर काँग्रेसने त्यांचे नेतृत्व स्वीकारले असते का?’ असे वक्तव्य गिरिराज यांनी केले होते. त्यावरून सोमवारी प्रचंड गदारोळ झाल्यानंतर सिंह यांनी खेद व्यक्त केला होता.
दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या वृत्तानुसार, मोदी यांनी मंगळवारी दुपारी १२ वाजता आपल्या कक्षात बोलावून त्यांना फटकारले. पंतप्रधान कार्यालयातून निघाल्यानंतर गिरिराज संसदेच्या गॅलरीत स्मृती आणि एका अन्य अधिका-यासमोर भावुक झाले. चष्मा काढून त्यांनी अश्रू पुसले. त्या वेळी स्मृतींनी त्यांना जवळच्या कक्षात नेले आणि येथे रडणे योग्य नाही, स्वत:ला सांभाळा, असे त्यांना सांगितले.