आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Giriraj Singh Broke Down After Meeting Pm Modi Over Sonia Gandhi Remark

सोनियांवरील वक्तव्यावरुन मोदींनी फटकारले, गिरिराज रडत बाहेर पडले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह्य विधान करणारे केंद्रीय राज्यमंत्री गिरिराज सिंह यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खरडपट्टी केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सोमवारी पंतप्रधान मोदींनी गिरिराज यांची 'शाळा' घेतल्यानतंर पीएमओमधून ते रडत बाहेर आले होते.
गिरिराज सिंह यांनी बिहारमध्ये एका पत्रकार परिषदेवेळी सोनिया गांधी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींबद्दल आक्षेपार्ह्य व्यक्तव्य केले होते. काँग्रेस अध्यक्षांबद्दल त्यांनी वर्णद्वेषी टीप्पणी केली होती. त्यावरुन सोमवारी लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनच्या दुसऱ्या टप्प्याच्या पहिल्या दिवशी काँग्रेस खासदारांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. त्यानंतर गिरिराज यांनी लोकसभेत खेद व्यक्त करत माफी मागितली होती. त्यांनतर लोकसभेतील गोंधळ शमला होता. या प्रकरणामुळे मोदींनी गिरिराज यांना भेटीसाठी बोलवाले होते.
माध्यमांमधील वृत्तांनुसार, पंतप्रधानांची भेटीनंतर त्यांच्या कार्यालयातून बाहेर पडत असताना गिरिराज यांच्या डोळ्यात अश्रू होते. मात्र गिरिराज यांनी मंगळवारी याला नकार दिला आहे.
मी पंतप्रधानांना भेटलोच नाही, खरडपट्टीची बातमी खोटी
मंगळवारी मीडियामध्ये खऱडपट्टीची बातमी आल्यानंतर गिरिराज यांनी ती सपशेल नकारली आहे. ते म्हणाले, 'कोणी सांगितले मी रडत बाहेर आलो. मी पंतप्रधानांना भेटलोच नाही. मी त्यांच्या भेटीसाठी वेळही मागितला नाही मग खरडपट्टी तर दूरच राहिली. माझ्याविरोधात षडयंत्र रचले जात आहे. मीडिया बेसलेस बातम्या चालवत आहे.'