आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Giriraj Singh No Better Than A Rapist Says Indias Daughter Director Leslee Udwin

\'निर्भया\' डॉक्युमेंट्री बनवणार्‍या लेस्ली उडविन यांनी गिरिराज सिंहांना म्हटले \'रेपिस्‍ट\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नदी दिल्ली- कॉग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीवर वर्णद्वेषी टिप्पणी करणारे केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते गिरिराजसिंह यांच्याविरोधात देशभरात आंदोलन सुरु झाले आहे. दुसरीकडे 'निर्भया' गॅंगरेपवर वादग्रस्त डॉक्युमेंट्री बनवणार्‍या ब्रिटिश चित्रपट निर्मात्या लेस्ली उडविन यांनी या प्रकरणात उडी घेतली आहे.

महिलांविरोधात वक्तव्य करणार सिंह हे एका रेपिस्ट पेक्षा कमी नसल्याचे लेस्ली उडविन यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंह यांच्याकडून राजीनामा घ्यावा, अशी मागणी उडविन यांनी केली आहे.

लेस्ली उडविन यांनी एका मुलाखतीत सांगितले की, विचार न करून केलेली टिप्पणी मला अस्वस्थ करते. मी बनवलेल्या डॉक्युमेंटरीमधून आरोपींना देखील आपली बाजू मांडण्याची संधी मिळते. परंतु, गिरीराज सिंह सारखे मंत्री 'निर्भया' गॅंगरेपातील दोषी मुकेश सिंह सारखे वक्तव्य करतात. पंतप्रधान मोदी यांनी गिरिराज सिंह यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी देखील उडविन यांनी केली आहे.

दरम्यान, गुरुवारी दिल्लीसह मुंबई आणि देशातील इतरही ठिकाणी संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी गिरिराजविरोधी आंदोलन सुरु केले आहे. त्यात बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी गिरिराज यांच्यावर निशाणा साधला आहे.

लालू म्हणाले, 'सर्वांना माहीत आहे, गिरिराज यांची पार्श्वभूमी काय आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक फर्जीवाडा आहे. या संघटनेचे अनेक बोगस नेते आहेत. गिरिराज यांना चोळी- बांगड्या देऊन त्यांच्या तोंडाला काळे फासले पाहिजे.' लालू यादव म्हणाले, असे विधान करणार्‍यांना शिक्षा देण्यासाठी देशात कठोर कायदा झाला पाहिजे. अशी विधाने गांभीर्याने घेतली पाहिजे. देशात लोकशाही आहे, असे विधान करुन लोक माफी मागतात आणि सर्व त्यावर समाधान मानतात. हे पुरेसे नाही.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, गिरिराज यांच्या निवासस्थानी फेकले अंडी आणि टॉमॅटो...