आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीने साधनेसाठी सोडले होते शहर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जन्म : ८ मे १९२९
कुटुंब : पती-मधुसूदन जैन, एक मुलगी
चर्चेत का? : पद्मविभूषणने सन्मानित झाल्यावर, ‘सरकार एवढी वर्षे झोपले होते का’, असा प्रश्न विचारला.

स्पष्टवक्त्या अशी ख्याती असणाऱ्या ठुमरी गायिका गिरिजादेवी यांच्याकडे एकदा कोणीतरी फ्यूजन ग्रुपसोबत सादरीकरणाचे निमंत्रण पाठवले. त्यांचे उत्तर होते, मला फ्यूजनचा विचारच क्रूरतापूर्ण वाटतो. त्या म्हणतात, ‘चैत्र मासे बोले रे कोयलिया हो रामा, हमारे अंगना’ हे गाणे पाश्चात्त्य ड्रम, गिटार आणि सेक्सोफोनवर कंपोज करू शकू ही कल्पनाच आपण कशी करू शकतो? या वाद्यांद्वारे त्याची नजाकत मी कशी सादर करू शकेन? त्या विनोदाने म्हणतात-जर मी असे केले तर कोकिळा उडून जाईल आणि कधीही माझ्या अंगणात येणार नाही.
चार वर्षांच्या असताना वडिलांनी पंडित सरजू प्रसाद मिश्रांकडे गाणे शिकण्यासाठी पाठवले. वडिलांनी त्यांना मुलासारखे सांभाळले. त्यांनी गिरिजा यांना घोडेस्वारी शिकवली, उर्दू व इंग्रजी शिकवण्यासाठी घरी शिक्षक नियुक्त केले. पंडित सरजूप्रसाद हे गिरिजादेवींचे पहिले गुरू होते. त्या १५ वर्षांच्या असताना गुरूचे निधन झाले. त्यांनीच ख्याल, ठुमरी, टप्पा शिकवला.
तेव्हा काशीच्या मनकामेश्वर मंदिरात उस्ताद फय्याजखान पहाटे ३.३० वाजता राग गात असत. एकेदिवशी गिरिजाचे वडील मुलीलाही सोबत घेऊन गेले. फय्याजखान यांनी आलाप घेताच गिरिजाच्या डोळ्यांतून अश्रू वाहायला लागले. काही वेळाने गाणे थांबले तेव्हा फय्याजखान यांनी ‘ही मुलगी कोणाची’ असा प्रश्न विचारला. रामदेव राय उत्तरले, ही माझी मुलगी. फय्याज खान साहेब म्हणाले, तुमच्या घरात एका महान कलावंताने जन्म घेतला आहे. एवढ्या कमी वयात तिला संगीताची मोठी जाण आहे. वयाच्या १५ व्या वर्षीच गिरिजांचा विवाह मधुसूदन जैन यांच्याशी झाला. ते व्यावसायिक होते. ते संगीत आणि काव्याचे शौकीन होते. त्या वेळी आपले गाणे कायम ठेवण्यासाठी मदत करणारा पती मिळाल्याने आपण भाग्यवान आहोत, असे गिरिजादेवी यांना वाटले. त्यांच्या गायनाचा रियाज कायम ठेवण्यासाठी त्यांच्या पतीने सारनाथला जाण्याचा निर्णय घेतला. त्या पतीसोबत सारनाथला गेल्या. पतीने गुरू सच्चिदानंद यांना शिकवण्यास राजी केले.

फय्याज खान साहेबांप्रमाणेच पहाटे ३.३० ला रियाज सुरू होत असे आणि तो एखाद्या आध्यात्मिक साधनेप्रमाणे चालत असे. त्यामुळे आयुष्यच बदलले. त्या २० वर्षांच्या होत्या, तेव्हा पहिल्यांदा आकाशवाणीच्या अलाहाबाद केंद्रावरून त्यांचे पहिले गाणे प्रसारित झाले. त्यानंतर गिरिजादेवी ‘ठुमरीची सम्राज्ञी’म्हणून नावारूपाला आल्या.