आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूड घेण्यासाठी 15 वर्षाच्या तरुणीने केला 2 वर्षांच्या चिमुकलीचा MURDER

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्लीच्या कल्याणपुरीमध्ये एका 15 वर्षीय तरुणीने सुडापोटी 2 वर्षीय मुलीची हत्या केल्याचे प्रकरण समोर आले आहे. या तरुणीला पोलिसांनी अटक केली आहे. मारलेल्या दोन वर्षांच्या चिमुकलीच्या आईने या तरुणीचा अपमान केला होता. त्याचा सूड घेण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे या मुलीने पोलिसांना चौकशीत सांगितले आहे.

काय आहे प्रकरण ?
हत्येचे हे प्रकरण 10 जूनचे आहे. 11वीमध्ये शिकणाऱ्या मुलीने तिच्या शेजारी राहणाऱ्या वर्षांच्या मुलीला टरबूज खायला देण्यासाठी म्हणून जवळ बोलवून घेतले. त्यानंतर तिला गळा दाबून त्या चिमुकलीची हत्या केली. या मुलीने हत्येनंतर या चिमुकलीचा मृतदेह तिच्या शाळेच्या बॅगमध्ये पॅक केला आणि नेऊन तो कालव्यात फेकून दिला. ज्यावेळी ही तरुणी तिच्या बॅगमध्ये मृतदेह घेऊन जात होती, त्याचवेळी शेजारचे सगळे लोक बेपत्ता मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा या तरुणीने मुलीचा मृतदेह बॅगेत घेतला आणि नंतर ऑटोमध्ये बसून निघून गेली आणि तिने तो मृतदेह कालव्यात फेकून दिला.

घरी येऊन केली आंघोळ
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही तरुणी मृतदेह कालव्यात फेकून घरी आल्यानंतर तिने आंघोळ केली आणि त्यानंतर ती अभ्यास करू लागली. शेवटी मुलगी या तरुणीबरोबरच आढळली होती, त्यामुळे पोलिसांना तिच्यावर शंका आली. या तरुणीने तिच्या 10 वर्षांच्या भावाला मृतदेह फेकला त्याठिकाणी पाठवले. हत्या केलेल्या त्या 2 वर्षांच्या मुलीच्या आईने काही वेळापूर्वीच सर्वांसमोर अपमान केला होता त्यामुळे रागात हा प्रकार केल्याचे तरुणीने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तरुणीला अटक केली असून तिच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे.