आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Girl Cannot Be Consenting Party In Gangrape Case: Supreme Court

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बहुतांश बलात्कार म्हणजे नियोजित कटच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - बलात्काराच्या बहुतांश घटना अचानक नव्हे, पूर्वनियोजित व एका कटाचाच भाग असतात, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले. अत्याचार केवळ ‘लैंगिक गुन्हा’ नसून पीडित महिलेवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासारखा हा गुन्हा आहे, असेही न्यायालयाने म्हटले.

झारखंडमध्ये 14 वर्षांपूर्वी झालेल्या सामूहिक अत्याचाराच्या घटनेतील आरोपींची शिक्षा कायम ठेवताना न्यायालयाने म्हटले की, पीडित महिलेसाठी हा जबर मानसिक धक्का तर असतोच; पण त्यामुळे तिच्यावर सामाजिक कलंकही लागतो. त्याचे पीडित महिलेच्या आयुष्यावर दीर्घकालीन परिणाम होतात. न्यायमूर्ती बी. एस. चौहान यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने निकाल देताना म्हटले की, पीडितेच्या खासगी आयुष्य व अधिकारांचे हे उल्लंघन होय. अशा पीडित महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. या खटल्याचे वैशिष्ट्य म्हणजे, प्रकरणाची सुनावणी सुरू असताना पीडित महिला वगळता तिच्या वडिलांसह सरकारी पक्षाचे सर्व साक्षीदार उलटले होते.

काय होते प्रकरण? : पीडित युवती सिनेमाहून येताना दोन मुलांनी तिला सोबत येण्याचा आग्रह केला. नकार दिल्यानंतर त्यांनी तिला जबरदस्तीने एका शाळेत नेऊन अत्याचार केले. इतर काही युवकही अत्याचारात सहभागी होते.