आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Girl Claims Through Facebook Post Mother Murder By Government Officials

अधिकारी व डॉक्टरांनीच केली आईची हत्या, \'फेसबुक पोस्ट\'मधून युवतीचा दावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- एका 19 वर्षाय युवतीची एक फेसबुक पोस्ट सध्या व्हायरल झाली आहे. पानीपतमधील पाच सरकारी अधिकारी आणि डॉक्टरांवर तिने हत्येचा आरोप केला आहे. अधिकारी व डॉक्टरांनीच तिच्या आईची हत्या केल्याचे तिने फेसबुक अकाउंटवरील पोस्टमधून केले आहे. इशिता अरोरा असे युवतीचे नाव आहे. इतकेच नव्हे तर इशिताने म्हटले आहे की, सर्व आरोपी तिच्या आईला मानसिक त्रास देत होते. तिच्याकडे सर्व पुरावे आहेत.

युवतीने केलेल्या पोस्टमध्ये आरोपीच्या नावाचा खुलासा केलेला नाही. त्यामुळे पोलिसांनी याप्रकरणी अद्याप कोणतीही कारवाई केली नाही. युवतीची पोस्ट आतापर्यंत एक लाख 30 हजार वेळा शेअर झाली आहे.

काय आहे फेसबुक पोस्टमध्ये...
फेसबुक अकाउंटनुसार, इशिता अरोरा ही अशोका यूनिव्हर्सिटीची विद्यार्थिनी आहे. आपली फेसबुक पोस्ट वरिष्ठ अधिकार्‍यांपर्यंत पोहोचावी आणि तिला न्याय मिळावा, अशी इशिता इच्छा आहे.

''माझी आई डॉ. सुनीता अरोरा हिची हत्या करण्‍यात आली आहे. मागील 30 वर्षांपासून ती पानीपतमधील समलखामध्ये वैद्यकीय सेवा देत होती. मा‍त्र, पाच सरकारी अधिकारी व डॉक्टरांनी काल तिची हत्या केली. माझ्याकडे आरोपीविरुद्ध सर्व पुरावे आहेत. आरोपी तिला मानसिक त्रास देत होते. याशिवाय आईच्या हत्येचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व सीसीटीव्ही फुटेज देखील आहेत. आतापर्यंत कोणत्याही सरकारी अधिकार्‍याला अटक झालेली नाही. माझी पोस्ट भारत सरकारच्या वरिष्ठ अधिकार्‍यांपर्यंत पोहोचवण्यात जे लोक मदत करत आहेत, त्यांची मी आभारी आहे. कृपया ही पोस्ट आपल्या वॉलवर शेअर करा. एखाद्या अग्नीप्रमाणे ही पोस्ट पसरवा. मला न्याय हवा आहे." इशिताने ही पोस्ट 19 सप्टेंबरला फेसबुक अकाउंटवर अपलोड केली होती.

पुढील स्लाइड्सवर वाचा, इशिता अरोराची फेसबुक पोस्ट...