आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 वर्षांची अहाना रडते तेव्हा निघतात रक्ताचे अश्रू; PM मोदींसह मुख्यमंत्र्यांना मदतीचे आवाहन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद - येथील 3 वर्षीय चिमुकली एका दुर्मिळ आजाराने ग्रस्त आहे. ती जेव्हा रडते, तेव्हा तिच्या डोळ्यातून पाणी नाही, तर रक्त येते. अहानाला 16 महिन्यांपूर्वी नाकातून रक्त येण्याचा त्रास होता. आता केवळ नाकातूनच नव्हे, तर तोंड, कान, डोळे आणि प्रायवेट पार्ट्समधूनही रक्तस्राव होत आहे. तिच्या वडिलांनी तेलंगाणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उपचारात मदतीचे आवाहन केले आहे. 
 
डॉक्टर म्हणाले...
- डॉ. सिरिषा यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, अहाना हिला एक अतिशय दुर्मिळ आजार आहे. यास हिमॅटीड्रोसिस (Hematidrosis) म्हटले जाते. यात रुग्णाचा घाम आणि अश्रू रक्तात मिश्रीत होऊन बाहेर येतात. उपचारानंतर अहानाचा रक्तस्राव कमी झाला तरीही हा रोग पूर्णपणे बरा झालेला नाही. यासाठी तिच्यावर पुढील उपचार करावे लागणार आहेत. अहाना सध्या हैदराबादच्या खासगी रुगणालयात अॅडमिट आहे.
- डॉक्टर पुढे म्हणाल्या, अहानाला मल्टीपल ट्रांसफ्यूजन आणि नियमित उपचाराची गरज आहे. ती लहान बाळ असल्याने तिच्या शारीरिक आरोग्यावर वाईट परिणाम झाला आहे. त्यामुळे, हा रोग पूर्णपणे उपचार करून बरा करावाच लागणार आहे."
 
 
मुख्यमंत्री, पंतप्रधानांना मदतीचे आवाहन
- अहानाचे वडील मोहम्मद अफजल म्हणाले, जेव्हा तिच्या डोळ्यातून रक्तस्राव होते तेव्हा तिला झटके येतात. ती बेशुद्ध पडते. अशा वेळी आम्हाला काहीही सूचत नाही. 
- अफजल यांनी तिच्या उपचारासाठी सीएम केसी राव आणि पीएम नरेंद्र मोदी यांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.
- डॉक्टरांना कायमचे उपचार करण्याबाबत विचारणा केल्यास त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे उत्तर नसते. त्यामुळेच, आपण मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना मदतीचे आवाहन केले आहे असे तिचे वडील म्हणतात.
- केवळ पीएम आणि सीएम नव्हे, तर सेवाभावी संस्थांनी सुद्धा आपल्या मुलीच्या उपचारासाठी पुढे यावे अशी विनंती अफजल यांनी केली आहे.
बातम्या आणखी आहेत...