आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Girl Of Jodhpur Fight Against Kejriwal In Delhi Election

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : दिल्लीत केजरीवालांना टक्कर देणारी नुपूर आहे जोधपूरच्या उद्योगपतीची मुलगी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - नुपूर शर्मा
जोधपूर - दिल्ली लोकसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांचा भाजपच्या नुपूर शर्मा यांच्याकडून पराभव व्हावा अशी जोधपूरच्या एका गटाची इच्छा आहे. विशेषतः नुपूर यांच्या प्रचाराची धुरा वाहणारे उद्योगपती आणि निर्यातदार यांना तसे वाटते. नुपूर या जोधपूरच्या एका हँडीक्राफ्ट एक्सपोर्टरच्या कन्या आहेत. त्यांचे वडील विनय शर्मा जोधपूरच्या बासनी येथे नुपूर इंटरनॅशनल नावाचे एक्सपोर्ट यूनिट आहे. नुपूर त्याठिकाणी लीगल अॅडव्हायजर आहेत.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार असलेल्या राजस्थानच्या नुपूर शर्मा यांचे वडील विनय शर्मा यांच्या मते, 2008 मध्ये दिल्ली यूनिव्हर्सिटीमध्ये नुपूर यांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अध्यक्षपदाच्या उमेदवार बनवले तेव्हा त्यांच्या चिंता वाढल्या होत्या. कारण त्यांच्या कुटुंबातील कोणीही त्याआधी राजकारणात आलेले नव्हते. त्यावेळी नुपूर यांच्या आई त्यांच्या बाजुने होत्या.

जोधपूरचे निर्यातदारही त्यांचा विजय व्हावा म्हणून दिल्लीत पूर्ण जोर लावत आहेत. एक्सपोर्टर कॅप्टन महेंद्र माथूर आणि भाजप नेते सागर जोशी त्यासाठी दिल्लीत तळ ठोकून आहेत. जोधपूर हँडीक्राफ्ट एक्सपोर्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष निर्मल भंडारी यांच्यासह निर्यातदारांचा एक गट निवडणुकीत नुपूर यांना मदत करण्यासाठी दिल्लीला जात आहे.

दरम्यान, निवडणुकीत मारवाडी लोकांद्वारे दाखवण्यात येणारी आपुलकी चांगली कामी येत आहे. दिल्ली आणि परदेशात शिक्षण झाले असले तरी, राजस्थान व विशेषतः जोधपूरमध्ये त्यांचे नेहमीच येणे जाणे राहिलेले आहे. त्यांच्या निवडणुकीच्या प्रचारासंदर्भात जोधपूरच्या अनेत लोकांकडे महत्त्वाच्या जबाबदारी आहेत.
अभाविपमधून डीयूच्या अध्यक्ष बनल्या
नुपूर यांच्या नेतृत्त्वगुणाची चमक सर्वात आधी अभाविपमध्ये दिसून आली होती. 2008 मध्ये त्या अभाविपमध्ये सहभागी झाल्या. त्याचवर्षी त्यांनी दिल्ली विद्यापीठात विद्यार्थी संसदेच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार घोषित करण्यात आले. निवडणूक जिंकली आणि एख वर्ष अभाविपमध्ये काम केल्यानंतर त्या भाजपशी संलग्न झाल्या. 2010 मध्ये त्यांना भाजपच्या युवा मोर्चात मीडिया सहप्रभारी हे पद देण्यात आले.
नुपूर या सध्या भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीतील स्थायी सदस्य आहेत. भाजपच्या सदस्य नोंदणी अभियानातही त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी दिल्ली युनिव्हर्सिटीतून पदवी पूर्ण केली तसेच त्याच्यानंतर एलएलबी केले. नुपूर लंडनच्या स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधूव एलएलएम पूर्ण केल्यानंतर आता वकिली करत आहेत.
पुढील स्लाइड्वर पाहा, नुपूर यांच्या प्रचाराचे आणि इतर PHOTO