नवी दिल्ली - उत्तर दिल्लीच्या सिव्हील लाइन्स परिसरात एका मुलीवर गँगरेप करून तिला रस्त्यावर फेकून देण्यात आल्याचा प्रकार घडला. विशेष म्हणजे ज्याठिकाणी या मुलीला फेकण्यात आले ती जागा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद
केजरीवाल यांच्या घरापासून काही मीटर अंतरावरच आहे.
पोलिसांना विकासभवनच्या जवळ ही मुलगी पडलेली आढळून आली. त्यांनंतर पोलिसांनी तिला ट्रॉमा सेंटरला पाठवले. त्यानंतर मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी एलएनजेपी रुग्णालयात नेण्यात आले. या घटनेबाबत माहिती मिळताच पोलिसांचे प्रमुख अधिकारीही लगेचच घटनास्थळी दाखल झाले होते.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या तरुणीला तिच्याबरोबर काम करणाऱ्या सहका-यांनी पेयामध्ये गुंगीचे औषध मिळवून तिला दिले असावे अशी शंका पोलिसांना आहे. गुंगीचे औषध दिल्यानंतर तिच्यावर गँगरेप करण्यात आला आणि त्यानंतर तिला विकास भवन जवळ फेकून देण्यात आले अशी शंकाही आहे. पोलिस सध्या वैद्यकीय चाचणीच्या अहवालाची वाट पाहत आहेत.