आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयिन मुलीवर 13 दिवस सामुहिक बलात्कार, गोळ्या झाडून विहिरीत फेकले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नोएडा (उत्तर प्रदेश) - उत्तरप्रदेशातील एका अल्पवयिन मुलीसोबत दुष्कृत्याचे प्रकरण समोर आले आहे. 22 नोव्हेंबर रोजी मुलीला तिच्या घरासमोरुन तीन जणांनी किडनॅप केले होते. तिघांनी मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर तिच्यावर दोन गोळ्या झाडल्या आणि मरण्यासाठी तिला एका विहिरीत फेकून दिले. मुलीची आर्त किंकाळी ऐकून काही लोक तिच्या मदतीला धावले. तिची प्रकृती अजून नाजूक आहे. सोमवारी या प्रकरणी सामुहिक बलात्काराचा गुन्हा गुन्हा दाखल झाला आहे.

काय आहे प्रकरण
- 15 वर्षांच्या मुलीचे 22 नोव्हेंबर रोजी सायंकाळी तीन जणांनी अपहरण केले.
- आरोपी तरुणांनी मुलीला नोएडा येथील एका गावात नेले. तेथिल या रिकाम्या घरात 13 दिवस तिच्यासोबत दुष्कृत्य केले.
- शनिवारी रात्री मुलीच्या पोटात आणि छातीत दोन गोळ्या झाडून तिला तुघलकपूर गावातील एका कोरड्या विहिरीत फेकले.
- रविवारी सकाळी एका व्यक्तीने तिचा आवाज ऐकला. त्याने गावकऱ्यांना बोलावून तिला विहिरीबाहेर काढले. पोलिसांना घटनेची माहिती दिली.
- गंभीर अवस्थेत मुलीला हॉस्पिटलला दाखल करण्यात आले. रात्री तिच्यावर दोन गोळ्या झाडल्यानंतर आणि रात्रभर रक्तस्त्राव झाल्यानंतरही ती जिवंत राहिली याबद्दल डॉक्टरांनी आश्चर्य व्यक्त केले.
- मुलीची प्रकृती अतिशय गंभीर असतानाही तिने पोलिसांना सर्व हकिकत विस्ताराने सांगितली. तिन्ही आरोपींना मुलगी ओळखते. तिघांपैकी एक अल्पवयिन असल्याची माहिती आहे. त्यांच्या अटकेसाठी पोलिस पथक तयार करण्या आले आहेत.
बातम्या आणखी आहेत...