आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टेंटसाठी उकळलेली रक्कम त्वरित परत द्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- स्टेंटसाठी जास्तीची रक्कम उकळणाऱ्या रुग्णालयांना केंद्र सरकारने उर्वरित रक्कम रुग्णांना त्वरित परत करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्या रुग्णालयांवर लक्ष आहे, त्यांनी मागणी नोटिसीच्या आधी जास्तीची रक्कम रुग्णांना परत केली तर त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असे राष्ट्रीय औषधी मूल्य निर्धारण प्राधिकरण एनपीपीएने म्हटले आहे.

एनपीपीएच्या हेल्पलाइनवर शुक्रवारी हरियाणाच्या रोहतक व उत्तराखंडच्या डेहराडूनमध्ये स्टेंटसाठी जास्तीची रक्कम उकळण्यात आल्याच्या तक्रारी आल्या आहेत. ऑक्सिजन हॉस्पिटल व भारत हार्ट इन्स्टिट्यूटविरुद्ध या तक्रारी आल्या आहेत. भविष्यात अशा रुग्णांच्या बिलाचे लेखापरीक्षण होेईल.
 
मात्र रुग्णाची भविष्यातील गरज लक्षात घेऊन संपूर्ण तपशील जाहीर होणार नाही, असे एनपीपीएने म्हटले आहे. मुंबईचे लीलावती रुग्णालय, दिल्लीचे मॅक्स, फरिदाबादचे मेट्रो, चंदिगडचे पीजीआय आणि बरेलीचे राममूर्ती रुग्णालय यांनी जास्तीची रक्कम उकळल्याच्या आरोपाची चौकशी केली असून संबंधित राज्य औषधी नियंत्रकांना सतर्कतेचे आदेश दिल्याचे एनपीपीएने म्हटले.
 
 ह्रदयविकाराच्या रुग्णांना दिलासा देत एनपीपीएने ह्रदयघाताच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या स्टेंटच्या किंमतीत ८५ टक्क्यांची कपात केली होती. वेगवेगळ्या स्टेंटच्या किंमती कमी करून ७,२६० ते २९,६०० रुपयांपर्यंत आणल्या आहेत.
बातम्या आणखी आहेत...