आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Give Life Imprisment For Milk Adultration, Supreme Court Orderd To States

दूध भेसळीसाठी जन्मठेप ठोठवा,सर्वोच्च न्यायालयाचे राज्यांना निर्देश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दुधातील वाढत्या भेसळीबाबत चिंता व्यक्त केली. भेसळयुक्त दुधाचे उत्पादन व मार्केटिंग करणार्‍यांना जन्मठेपेपर्यंतची शिक्षा करण्याबाबत काय उपाययोजना केल्या, अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यांना केली.

दूध भेसळीला आळा घालण्यासाठी राज्यांना आदेश देण्याबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायालय सुनावणी करत होते. दूध भेसळीचा मुद्दा अत्यंत गंभीर असून त्याला आळा घालण्यासाठी सर्व राज्यांनी तत्काळ पावले उचलावी, असे निर्देश न्यायमूर्ती के.एस. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखालील न्यायपीठाने दिले. भेसळीवर नियंत्रणासाठी काय उपाय केले, तसेच भेसळ करणार्‍यांना जन्मठेपेपर्यंतची शिक्षा होण्यासाठी काय तरतुदी केल्या आहेत, याबद्दल न्यायालयाने शपथपत्र दाखल करण्याचेही निर्देश राज्यांना दिले आहे. उत्तर देण्यासाठी न्यायालयाने राज्यांना तीन आठवड्यांची मुदत दिली आहे.