आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शहिदांची व ‘राजद्रोहा’च्या आरोपींची यादी जाहीर करा, केंद्रीय माहिती आयोगाचा केंद्राला आदेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशभक्ती आणि देशद्रोह याबद्दल वाद सुरू असतानाच माहिती आयोगाने शहिदांची आणि ‘राजद्रोह’ व ‘देशद्रोहा’च्या आरोपींची नावे जाहीर करावी, असा आदेश माहिती आयोगाने केंद्र सरकारला दिला आहे. आयोगाने एका आरटीआय कार्यकर्त्याच्या याचिकेवर गृह मंत्रालयाला हा आदेश दिला.

मुरादाबाद येथील पवन अग्रवाल यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे शहिदांची आणि देशद्रोही जाहीर केलेल्या लोकांची यादी मागवली होती. पीएमओने हा अर्ज गृह मंत्रालयाकडे पाठवला. गृह मंत्रालयाने त्याच्या उत्तरात म्हटले होते की, ‘देशभक्त’, ‘शहीद’ आणि ‘देशद्रोही’ असे वर्गीकरण करणारी कुठलीही यादी आम्ही तयार केलेली नाही. त्यामुळे अशी माहिती दिली जाऊ शकत नाही. जी माहिती रेकॉर्डमध्ये नाही ती देणे अनिवार्य नाही, असे आरटीआय कायद्यात स्पष्ट करण्यात आले आहे.

अग्रवाल यांनी गृह मंत्रालयाच्या आदेशाला माहिती आयोगात आव्हान दिले. त्यांनी म्हटले आहे की, गृह मंत्रालयाकडे ज्या प्रकारे स्वातंत्र्यसेनानींची यादी असते तशीच ज्यांना ‘शहीद’ जाहीर करण्यात आले आहे किंवा जे ‘राजद्रोह’ आणि ‘देशद्रोह’ यासारख्या कारवायांत सहभागी आहेत त्यांचीही यादी असायला हवी. त्यानंतर माहिती आयुक्त सुधीर अग्रवाल यांनी म्हटले आहे की, जर गृह मंत्रालयाकडे अशी माहिती नाही तर ज्यांच्याकडे अशी माहिती असेल त्यांच्याकडे हा अर्ज सोपवावा, पण प्रश्नाचे उत्तर मिळायलाच हवे.
बातम्या आणखी आहेत...