आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Give Permission To Caree 15 Lakh Rupees, Special Investigation Team Instruction

१५ लाखांपर्यंत रोख बाळगू द्या, काळ्या पैशाचा तपास करणा-या विशेष पथकाची सूचना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - लोकांना कोणत्याही वेळी कमाल १५ लाख रुपयेच जवळ बाळगण्याची परवानगी असावी, अशी सूचना काळ्या पैशाचा तपास करणा-या विशेष पथकाने (एसआयटी) केली आहे. त्यामुळे काळ्या पैशाला लगाम घालण्यास मदत मिळेल, असे पथकाचे म्हणणे आहे.एसआयटीने सर्वोच्च न्यायालयात ही सूचना सादर केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशावरूनच एसआयटी स्थापन झाली होती. एसआयटीच्या म्हणण्यानुसार, देशात बराच काळा पैसा रोख रकमेच्या स्वरूपात आहे.