आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Global Summit In Delhi For Non Conventional Energy Sources

अपारंपरिक ऊर्जेसाठी दिल्लीत ग्लोबल समीट, ६० देशांचे २००० प्रतिनिधी भाग घेणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशात अपारंपरिक ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी, नवनवीन तंत्रज्ञान समजून घेऊन त्या क्षेत्रात गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी प्रथमच व्यापक प्रमाणावर जागतिक गुंतवणूक संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या तीन दिवसीय संमेलनात देशभरातून २००० पेक्षा जास्त प्रतिनिधी, गुंतवणूकदार, सरकारी अधिकारी सहभागी होणार असून रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचे उद््घाटन करणार आहेत.

केंद्रीय ऊर्जा व कोळसामंत्री पियूष गोयल यांनी सांगितले की, देशात सध्या सौरऊर्जेचे ३००० मेगावॅट उत्पादन होते. २०२२ पर्यंत ते एक लाख मेगावॅट पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. या शिवाय पवनऊर्जा उत्पादन २२००० वरून ६०,००० मेगावॅटपर्यंत नेण्यासाठी अनेक आघाड्यांवर प्रयत्न केले जात आहेत. त्यादृष्टीने केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा विभाग सौर ऊर्जा, पवन व जलविद्यूत प्रकल्पांचे महत्वाकांक्षी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी या संमेलनात तज्ज्ञांसोबत तसेच विविध देशांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करून गुंतवणूकदारांना या क्षेत्राची दारे खुली केली जाणार आहेत.
विज्ञान भवनात आयोजित या संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे. गोयल यांनी सांगितले की, जलवायू परिवर्तनामुळे जगभरात अपारंपरिक ऊर्जेला प्रोत्साहन दिले जात आहे. भारतातदेखील स्वच्छ ऊर्जेमध्ये आपला हिस्सा वाढवण्यास उत्सूक आहे. अक्षय ऊर्जेच्या क्षेत्रात भारत मागास देश मानला जातो. या क्षेत्रात गुंतवणुकीची जर्मनीची तयारी आहे.
भारतात गुंतवणूक करण्यास उत्सूक आहे. गेल्या पाच वर्षांत या क्षेत्रात भारतात सुमारे सहा लाख कोटींची गुंतवणूक झाली आहे. देशाला या क्षेत्रात स्वावलंबी बनवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

दाभोळ वीज प्रकल्प लवकरच सुरू होणार
महाराष्ट्रातील दाभोळ वीज प्रकल्प सध्या बंद पडलेला आहे. परंतु येत्या काही महिन्यांत त्याचे काम सुरू होणार आहे, असे संकेत केंद्रीयमंत्री गोयल यांनी दिले. देशभरातील पॉवरग्रीडची क्षमता सुधारण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाची मदत घेणार आहोत. नवे ग्रीडदेखील उभारले जात आहेत. दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीचे सरकार येणार असले तरीही अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयातर्फे सुरू असलेला 'इन्व्हर्टर मुक्त राजधानी'चा कार्यक्रम सुरूच राहणार असल्याचे पीयूष गोयल यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव अथवा नवीन पटनायक या सर्वांसोबत आमचे संबंध मधूर आहेत. राज्यांना सोबत घेऊन ऊर्जा उत्पादन क्षेत्रात नवा विक्रम प्रस्थापित करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे गोयल म्हणाले.