आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वात मोठे मालवाहू विमान 'ग्लोबमास्टर' हवाई दलाच्या ताफ्यात दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंडन - बोइंग सी-17 ग्लोबमास्टर हे सर्वात मोठे मालवाहू विमान सोमवारी भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात दाखल झाले. या विमानामुळे रणगाडे आणि सैनिकांना युद्धभूमीवर सहजतेने पोहोचवण्याची भारताची क्षमता आणखी बळकट झाली आहे. संरक्षणमंत्री ए. के. अँटनी हिंडन हवाई तळावर ग्लोबमास्टर हवाई दलात सामील केले. या विमानामुळे सामरिक आणि बिगरपारंपरिक मोहिमाही पूर्णत्वास नेल्या जातील, असे अँटनी म्हणाले. सी-17 ग्लोबमास्टर 3 हे विमान अमेरिकेकडून विकत घेण्यात आले आहे. या करारावर 20 हजार रुपये कोटींपेक्षाही जास्त खर्च झाला असण्याची शक्यता आहे. या वेळी हवाई दल प्रमुख एन. ए. के. ब्राउन उपस्थित होते. सी-17 ग्लोबमास्टरचा वापर ईशान्येकडील राज्यात ‘अँडव्हान्स्ड लँडिंग ग्राउंड’वरून आणि उत्तर तथा अंदमान-निकोबार प्रदेशात अत्यधिक उंचीच्या क्षेत्रातही केला जाऊ शकतो, असे ब्राउन म्हणाले.


असे आहे ग्लोबमास्टर
सुमारे 70 टन वजन आणि शस्त्रास्त्रांनी सज्ज 150 हून अधिक जवानांना नेण्याची क्षमता. चार इंजिनाचे हे विमान न थांबता 4200 किलोमीटर उड्डाण घेऊ शकते. ते रशियाच्या आयएल 76 विमानांची जागा घेणार आहे. 40 टन वजन नेण्याची क्षमता असलेले हे विमान भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान होते.