आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#Intolerance: सिंह म्हणाले, करणला चोपून काढा, माझ्या मागे लागू नका!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर- जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये निर्माता करण जोहर यांनी केलेल्या टीकेवरून देशात रान पेटले आहे. देशात बोलण्याचे स्वातंत्र आहे, हा एक विनोद आहे. इतकेच नव्हे तर देशात लोकशाही आहे, हा तर त्याहीपेक्षा मोठा विनोद असल्याचे करणने म्हटले होते. करण जोहरच्या या वक्तव्यावर परराष्ट्र राज्यमंत्री जनरल व्ही.के. सिंह यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. सिंह यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना वादग्रस्त वक्तव्य केले आहे. 'करणला चोपून काढा, माझ्या मागे मात्र लागू नका', असे सिंह यांनी म्हटले आहे.

करण जोहर यांनी गुरुवारी जयपूर फेस्टिव्हलमध्ये बोलताना "मन की बात' सांगण्यास भारत सर्वात अडचणीचा देश आहे, असे म्हटले होते. त्यावर काँग्रेसने शुक्रवारी मोदी सरकारवर हल्लाबोल चढवला, तर भाजपने काँग्रेसला प्रत्युत्तर देत भारतच सर्वात मोठा सहिष्णू देश असल्याचा दावा केला आहे.

भारताला 'श्रीकृष्ण' व पाकिस्तानला 'शिशुपाल' का म्हटले व्ही. के. सिंह....
- परराष्‍ट्र राज्यमंत्री जनरल व्ही.के. सिंह शुक्रवारी भाजप कार्यकर्त्यांच्या एका बैठकीत सहभागी होण्यासाठी जोधपूरला पोहोचले होते.
- भारत- पाक संबंधांवर सिंह म्हणाले- श्रीकृष्णाने शिशुपालला 99 वेळा माफ केले होते. मात्र, शंभरव्यांदा मात्र त्याला शिक्षा दिली होती. पाकिस्तानचे देखील असेच होणार आहे. भारत श्रीकृष्णाची भूमिकेत असून पाकिस्तान शिशुपालसारखे वर्तन करत आहे.
- पाकिस्तानातील सिंध प्रांतातील हिन्दुंना टॉर्चर केले जात असल्याच्या मुद्यावर भारत सरकार ठोस पाऊल उचलत असल्याचे सिंह यांनी सांगितले.
अन सुटेबल बॉय
करण जोहर याने जेएलएफ - 2016 च्या पहिलया दिवशी "अन सुटेबल बॉय' या चर्चासत्रात शोभा डे यांच्यासोबत बोलताना सहिष्णुतेच्या मुद्द्यावर व्यंगात्मक टिप्पणी केली. तो म्हणाला की देशात बोलण्याचे स्वातंत्र्य लोकशाही हा सर्वात मोठा विनोद आहे. तुम्ही "मन की बात' करू इच्छिता, तुमच्या खासगी आयुष्यतील रहस्ये सांगू इच्छित असाल तर भारत सर्वात अडचणीचा देश आहे. मला तर सतत असे वाटत राहते की एखादी कायदेशी नोटीस माझी सातत्याने पाठपुरावा करत आहे.

कॉंग्रेसचा मोदी सरकारवर हल्लाबोल...
जोहर यांचे वक्तव्य प्रकाशित झाल्यानंतर काँग्रेसचे नेते मनिष तिवारी यांनी रालोआ सरकारवर हल्लाबोल केला. "हे सरकार बुद्धिजीवींचा आवाज दाबण्याचे काम करत असल्याचे स्पष्ट होते. सर्वच स्तरावर तणाव आहे. अनुपम खेर वगळता सर्वच कलाकार, लेखक, चित्रकार म्हणत आहेत की हे सरकार त्यांचा आवाज दाबत आहे. ' केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांनी हे आरोप फेटाळून लावताना "संपूर्ण जग भारत सहिष्णू देश असल्याचे म्हणत असल्याचा दावा केला. केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनीही देशाबाबत सहिष्णुतेबाबत प्रश्न विचारणाऱ्यांच्या ज्ञानाबाबत शंका उपस्थित होत असल्याची टीका केली.