आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोव्यात मोदींच्या \'राज्यभिषेका\'ची तयारी तर दिल्लीत अडवाणींची तब्येत बिघडली !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सुमारे 11 वर्षांनंतर गोव्यात भाजपचे राष्ट्रीय नेते शुक्रवारी एकत्र येत आहेत. या वेळी अन्य धोरणात्मक चर्चेपेक्षा नरेंद्र मोदींचा ‘राज्याभिषेक’ हाच मुख्य अजेंडा आहे. तेव्हा गुजरात दंगलीनंतर अटलबिहारी वाजपेयी यांच्या सूचनेवरून मोदी हटाव मोहीम तीव्र होती. मात्र, लालकृष्ण अडवाणी यांनी मोदींचा बचाव केला. आता हे चित्र पालटले आहे. यंदा मोदींच्या नेतृत्वात अडवाणीच अडथळे आणत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रमुख नेत्यांच्या बैठकीनंतर शनिवार-रविवारी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होत असून मोदींची निवडणूक प्रचार समितीच्या प्रमुखपदी नियुक्ती निश्चित मानली जात आहे. दरम्यान, अडवाणी यांची प्रकृती बरी नसल्यामुळे ते गोव्याच्या बैठकीला उपस्थित राहू शकत नसल्याचे पक्षाचे नेते व्यंकय्या नायडू यांनी सांगितले आहे.
बैठकीत मोदींबद्दल स्पष्ट संदेश देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे पक्षाचे सरचिटणीस राजीव प्रताप रुडी यांनी म्हटले आहे. मात्र, यशवंत सिन्हा यांनी ही शक्यता फेटाळली. त्यांच्या मते निर्णय पक्षाच्या संसदीय मंडळाने घ्यायचा आहे.
हे नेते अनुपस्थित : उमा भारती, वरुण गांधी, रविशंकर प्रसाद, जसवंतसिंह आणि शत्रुघ्न सिन्हा. उमा भारती आजारी तर वरुण गांधी पत्नीसह पॅरिस दौर्‍यावर आहेत. प्रसाद श्रीलंका दौर्‍यावर आहेत.

पक्षात दोन मतप्रवाह
1. लोकसभा व पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीसाठी एकच प्रचार समिती नेमावी. नेतृत्व मोदींकडे द्यावे. यातून कार्यकर्त्यांना स्पष्ट संदेश जाऊ शकेल.

2. लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी वेगवेगळी प्रचार समिती असावी. लोकसभेची जबाबदारी मोदींवर व विधानसभा निवडणुकीची जबाबदारी अन्य नेत्यावर सोपवावी.