आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोवा : 13 अनाथ एड्सग्रस्त मुलांना शाळेतून काढले, आणखी 23 जणांना काढण्याची तयारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पणजी - दक्षिण गोव्याच्या रिवोना गावातील नित्य सेवा निकेतनच्या एका शाळेने 13 अनाथ एड्स पीडितांना गेल्या आठवड्यात शाळेतून काढले होते. इतर मुलांच्या पालकांच्या दबावामुळे हा निर्णय घेतला होता. पण आता शाळेने एड्सची लागण झालेली नसलेल्या इतर 23 अनाथ मुलांनाही शाळेतून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, 6 ते 15 वयोगटातील 13 मुलांना नॉर्थ गोवा येथील दुस-या शाळेत दाखल करण्यात आले आहे.
ही मुले रोज शाळेत हजर राहत नसल्यामुळे त्यांना संस्थेच्याच बालघरमध्ये शिकवले जाणार असल्याचे नित्य सेवा निकेतनच्या इन्चार्ज सिस्टर अलफोंसा पोराथूर यांनी सांगितले. त्यामुळे ही मुले आता केवळ परीक्षेसाठी शाळेत येतील.
ज्याने सहारा दिला त्यानेही सोडले
या एड्स पीडित मुलांसाठी शाळांचे दरवाजे बंद झाल्याने सिस्टर पोराथूर यांनी एका बोर्डींग स्कूललाही या मुलांना प्रवेश देण्याबाबत विचारणा केली होती. पण इतर मुलांच्या पालकांनी तक्रार करण्यास सुरुवात केल्याने त्यांनीही अवघ्या सहा दिवसांत मुलांना परत नेण्यास सांगितले.

सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार कोणत्याही मुलाला त्याच्या आजारामुळे शाळेतून काढता येत नसल्याचे आर्चडिओकेसन बोर्ड ऑफ एज्युकेशनचे फादर मेवरिक फर्नांडिस यांनी सांगितले आहे. आम्ही पालकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहोत. पण त्याच बरोबर राज्य बाल आयोग आणि शिक्षण विभागासमोरही हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचेही ते म्हणाले. तर स्थानिक भाजप आमदार सुभाष फलदेसाई यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचे म्हटले आहे.
(फोटो-प्रतिकात्मक)