आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परमेश्वर पाकिस्तानला सद् बुद्धी देवो - गृहमंत्री राजनाथ सिंह

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी पाकिस्तानवर निशाणा साधला. संबंध सुधारण्याचे सर्व प्रयत्न करून झाले आहेत. परंतु शेजारी ऐकण्यास तयार नाहीत, असे गृहमंत्र्यांनी पाकिस्तानचा नामोल्लेख न करता स्पष्ट केले. सार्क देशांच्या गृहमंत्र्यांच्या बैठकीसंबंधी राज्यसभा व लोकसभेला त्यांनी शुक्रवारी माहिती दिली. त्याचबरोबर पाकिस्तानला सदबुद्धी येवो, अशी आशाही व्यक्त केली.

राजनाथ म्हणाले, पाकिस्तानात मिळालेल्या वागणुकीबद्दल मला संकोच वाटतो. परंतु त्याबद्दल काहीही तक्रार नाही. पाकिस्तानने भारतीय प्रसारमाध्यमांना त्यांचे भाषण कव्हर करण्यास मनाई केली होती. दूरदर्शन, पीटीआय, एएनआयच्या पत्रकारांना बाहेरचा रोखण्यात आले होते. भाषण ब्लॅकआऊट करण्यात आले होते. परंतु ही परंपरा आपल्याला ठाऊक नाही. ते योग्य किंवा अयोग्य होते, हे सांगणे तूर्त तरी शक्य नाही.

सार्कच्या बैठकीत सायबर क्राइम, अमली पदार्थ तस्करीच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर दहशत वादासंबंधी भारताची चिंताही व्यक्त करण्यात आली. एका देशाचा दहशतवादी दुसऱ्या देशाचा शहिद होऊ शकत नाही. दहशतवाद्यांचे उदात्तीकरण केले जाऊ नये, असे सांगितले.
देशाच्या स्वाभिमानासाठी योग्य वागलो
सार्कच्या बैठकीनंतर सर्व नेत्यांसाठी आयोजित लंचचे आमंत्रण होते. परंतु राजनाथ सिंह थेट कारमध्ये बसून हॉटेलवर गेले. जेवण न करणे हा देशाच्या स्वाभिमानाचा विषय होता. कारण मी तेथे जेवणासाठी गेलेलो नव्हतो. त्यामुळे काहीही नाराजी नाही...पाहुणचारासाठी भारत तर जगभरात आेळखला जातो, असे राजनाथ म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...