आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देव तुम्हाला क्षमा कराे... जंग यांचा केजरींना टोला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्लीत नायब राज्यपाल नजीब जंग आणि अरविंद केजरीवाल यांच्यातील वाक्युद्ध संपण्याची अद्यापही चिन्हे दिसत नाहीत. जंग हे भाजपचे पोलिंग एजंट आहेत, असा आरोप केजरीवाल यांनी शुक्रवारी केला होता. त्यावर उत्तर देताना जंग म्हणाले, देवाने त्यांना क्षमा करावी. ते काय करत आहेत, हे त्यांना ठाऊक नाही.

सरकार चालवणे आणि नोकरशाहीवरील नियंत्रण यावरून उभयतांमध्ये सध्या वाद सुरू आहे. टीव्ही वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शुक्रवारी केजरीवाल यांनी जंग यांच्यावर आरोप केला होता. दिल्लीच्या लोकांनी आम्हाला निवडून दिले आहे, उर्वरित देशाने मोदींना. त्यामुळे आम्हाला दिल्ली चालवू द्या आणि तुम्ही (मोदी) देश चालवावा. रोज रोज नायब राज्यपालांच्या माध्यमातून आमच्या कामात अडथळे आणू नका. दिल्लीत पराभव झाल्याचा सूड अशा प्रकारे घेणे चुकीचे आहे. एवढेच नव्हे, तर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया किंवा दिल्लीच्या मंत्र्यांसमवेत बैठक घेण्यासाठी जंग वेळ देत नाहीत; परंतु भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या
चौकीदाराने जरी बोलावले तरी ते रांगत जातील. नायब राज्यपालांचे निवासस्थान हे भाजपचे आणखी एक मुख्यालय बनले आहे.

फिटनेस घोटाळ्याची फाइल उघडली
दिल्ली सरकारच्या भ्रष्टाचारविरोधी शाखेने (एसीबी) २००२ मध्ये झालेल्या १०० कोटी रुपयांच्या सीएनजी फिटनेस घोटाळ्याची फाइल पुन्हा एकदा उघडली आहे. त्यामुळे शीला दीक्षित यांच्या तत्कालीन सरकारमधील आघाडीच्या पदांवरील तीन अधिकारी अडचणीत येणार आहेत. एसीबीने २०१२ मध्ये यासंंबंधी एक तक्रार दाखल केली होती. ४९ दिवसांच्या सरकारच्या काळात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या प्रकरणात अाश्वासन दिले होते. सीबीआयने मागणी केल्यास सर्व दस्तऐवज दिले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले होते. परंतु केजरीवाल यांनी राजीनामा दिल्यानंतर या प्रकरणाची फाइल बंद झाली होती. मात्र या वेळी दिल्लीत बहुमताचे
सरकार आहे. त्यामुळे एसीबी विनाअडथळा तपास करेल.