आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंध्र-तेलंगणात पूरस्थिती गंभीर, गोदाकाठाला इशारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आंध्र प्रदेश-तेलंगणात पूरस्थिती गंभीर बनली आहे. एनडीआरएफच्या तुकड्यांना पाचारण करण्यात आले आहे. पुरात अडकलेल्या २४ मजुरांना हवाई दलाने वाचवले. दोन्ही राज्यांत एनडीआरएफच्या १७ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशातील गोदावरी, कृष्णा नदीच्या काठावरील जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. पावसाच्या विविध दुर्घटनांतील मृतांची संख्या ८ वर पोहाेचली आहे.
केंद्र सरकारच्या जलसंधारण मंत्रालयाच्या वतीने संबंधित राज्यांना हा इशारा देण्यात आला आहे. पुराच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात यावी, असे निर्देश केंद्राने दिले आहेत. तेलंगणातील निझामाबाद, अादिलाबाद, करीमनगर या भागात येत्या तीन ते चार दिवसांत पुराचा फटका बसू शकतो. आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यांनादेखील आगामी पाच-सहा दिवसांत मुसळधार पाऊस व पुराचा फटका बसू शकतो. बीड, लातूर, नांदेड (महाराष्ट्र), बिदर (कर्नाटक), निजामाबाद (तेलंगणा) यांचे पुरामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. कृष्णा खाेऱ्यातील कलाबुर्गी, यादगिरी, विजयपुरा, बगल कोट, रैचूर (कर्नाटक), मेहबूबनगर (तेलंगणा), कुर्नुलमध्येही (आंध्र प्रदेश) पुराचा फटका बसू शकतो.
तेलंगणातील मेडक जिल्ह्यात विविध दुर्घटनांत आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यात नियंत्रण कक्ष सुरू केले आहेत. दुसरीकडे सिंगूर धरणातून १.५० लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. मंजिरा नदीने धोक्याची पातळी आेलांडली आहे. त्यामुळे धोका वाढला आहे.

मदतकार्यासाठी ६० बोटी
आंध्र प्रदेश व तेलंगणातील परिस्थिती अत्यंत भीषण बनली आहे. दोन्ही प्रदेशातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एनडीआरएफचे ५५० जवान तैनात करण्यात आले आहेत. ६० बोटींच्या साह्याने मदत कार्याला वेग देण्यात आला आहे. सर्व साधने असलेल्या बचाव पथकाचे ३०९ जवान सक्रिय आहेत. त्याशिवाय ३२ रबरी बोटीदेखील बचाव कार्यात आहेत.
राज्यांत अतिवृष्टी
गेल्या काही दिवसांपासून आंध्र, तेलंगणामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती गंभीर बनली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मेडक, निझामाबाद या भागातील शाळा-महाविद्यालयांना सुटी देण्यात आली आहे.
एमपी-आेडिशातील मजूर
मेडक जिल्ह्यात पावसामुळे मंजिरा नदीवरील एका बेटावर २४ बांधकाम मजूर अडकले होते. ३६ तासांपासून त्यांना बेटावर त्यामुळे त्यांचे वाचले. हे मजूर मूळचे आेडिशा, मध्य प्रदेशातील आहेत.
बातम्या आणखी आहेत...