आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘गाेडसे’ शब्द अखेर संसदीय, नथुराम गोडसे शब्द असंसदीय असल्याचा केला बदल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - १९५६ पासून संसदेत ‘गाेडसे’ हा शब्द असंसदीय ठरविण्यात अाला हाेता. महात्मा गांधीजींचा मारेकरी नथुराम गाेडसेच्या कृतीचा फटका संपूर्ण ‘गाेडसे’ समुदायास बसत हाेता. मात्र नाशिकचे खासदार हेमंत गाेडसे यांनी याचा राज्यसभा व लाेकसभेत पाठपुरावा केला. चार महिन्याच्या त्यांच्या प्रयत्नानंतर संसदेच्या असांसदीय शब्दांच्या यादीतून ‘गाेडसे’ हा शब्द वगळण्यात अाला अाहे. राज्यसभेचे उपसभापती डाॅ. पी. जे. कुरीयन अाणि लाेकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी गाेडसे याएेवजी नाथुराम गाेडसे हा शब्द असंसदीय असल्याचा फेरबदल केला.

नाशिकचे खासदार हेमंत गाेडसे हे लाेकसभेत अाले तेव्हा त्यांचे अाडनावही असंसदीय शब्द म्हणून गाळला जात हाेता. याची गंभीर दखल घेत त्यांनी यासाठी लाेकसभाध्यक्ष व राज्यसभेचे उपसभापती या दाेघांनाही पत्रव्यवहार केला. मला लाेकांनी गाेडसे नावानेच निवडून संसदेत पाठविले असताना हा शब्द असंसदीय कसा असू शकताे? मला निवडणूक अायाेगाने निवडणूक लढण्याच मनाई का केली नाही? याबाबत त्यांनी विचारणा गेली. हा गाेडसे नाव असलेल्या समुदायाचा अपमान असल्याचा उल्लेखही त्यांनी पत्रात केला. दाेन्ही सभागृहाच्या २००९ च्या अनपार्लमेंटरी एक्सप्रेशनच्या यादीत गाेडसे हा शब्द असंसदीय म्हणून नाेंदल्याचे दिसून अाले. हा शब्द बदलण्यासाठी दाेन्ही सभागृहाच्या सचिवांची बैठक पार पडली. त्यात गाेडसे एेवजी फक्त ‘नथुराम गाेडसे’ हा शब्द असंसदीय ठरविण्यात अाला.

पी.जे. कुरियन यांनी जानेवारीमध्ये या शब्दावर शिक्कामाेर्तब केले तर लाेकसभाध्यक्षा महाजन यांनी १६ एप्रिल राेजी गाेडसेंना असांसदिय शब्दाच्या यादीतून बाहेर काढले. पी.जे. कुरियन यांनी जानेवारीमध्ये या शब्दावर शिक्कामाेर्तब केले तर लाेकसभाध्यक्षा महाजन यांनी १६ एप्रिल राेजी गाेडसेंना असांसदिय शब्दाच्या यादीतून बाहेर काढले.

अाणखी पाठपुरावा करणार : गाेडसे
‘गाेडसे हा शब्द असांसदीय यादीतून काढण्यात अाला. परंतु ज्या काेणाचे नाव नथुराम गाेडसे असेल त्याचे काय? हा प्रश्न अनुत्तरीत राहाताे. त्यामुळे महात्मा गांधीजींचा खून करणा-या नथुराम गाेडसेचे संपूर्ण नाव असंसदिय ठरवावे यासाठी प्रयत्न करावे लागणार अाहेत,’ असे खासदार गाेडसे यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना सांगितले.