आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकिस्तानमध्ये जाणे म्हणजे नरकात जाण्यासारखे : पर्रीकर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दहशतवादाला उघडपणे प्रोत्साहन देणारा पाकिस्तान हा स्वत:च त्याचे दुष्परिणाम भोगतो आहे. साेमवारी पाच दहशवाद्यांना भारतीय सैन्यदलाने यमसदनी पाठविले. पाकिस्तानात जाणे म्हणजे नरकात जाण्यासारखेच असल्याची जहाल टीका देशाचे संरक्षणमंत्री मनाेहर पर्रीकर यांनी केली.

दिल्लीलगत असलेल्या रेवाडी येथील तिरंगा यात्रेच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात मंगळवारी मनाेहर पर्रीकर बाेलत हाेते. त्यांनी पाकिस्तानच्या करणीचा पाढा वाचला. दहशतवादाचा पुरस्कार करणारा पाकिस्तान स्वत:च त्याचे परिणाम भाेगत आहे. पाकिस्तानला अंतर्गत कीड लागली आहे. हा देश अंतर्बाह्य कमजोर झाला आहे. काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेतून भारतात घुसखोरी करणाऱ्या ५ दहशतवाद्यांना सैन्य दलाने सोमवारी यमसदनी पाठवले. गेल्या ३ आठवड्यांत सीमारेषेवर १२ दहशतवादी ठार झाले आहेत. सैन्य दलाने शेजारी राष्ट्राचा घुसखोरीचा चौथा प्रयत्न स्वातंत्र्यदिनी हाणून पाडला आहे. समोरासमोर येऊन दाेन हात करण्याची ताकद या देशात नाही. त्यामुळे वैफल्यग्रस्त झालेला देश भारतात दहशतवादी पाठवून उचापती करण्याच्या कृती करतो. त्यातून उभय देशातील तणाव वाढू लागला.सीमेपलीकडून कुरापती सुरू असतात.

जेटलींच्या दौऱ्याकडे लक्ष
वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दि. २५ व २६ आॅगस्ट रोजी पाकिस्तानमध्ये सार्क देशांच्या अर्थमंत्र्यांची बैठक आहे. त्यात भारताचे वित्तमंत्री अरुण जेटली यांनी जाऊ नये अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. पंतप्रधान स्वत: याबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. भारताने पाकिस्तानविराेधात कडक भूमिका घेतली असल्याचे पंतप्रधान, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्यावरून दिसून येत आहे.

मोदींच्या भाषणातूनही पाकचा समाचार
७० व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून बाेलताना पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात पाकव्याप्त काश्मीर, गिलगिट व बलुचिस्तानचा थेट उल्लेख करत पाकिस्तानकडून मानवाधिकाराचे उल्लंघन सुरू असल्याकडे लक्ष वेधले हाेते, तर िद. १२ आॅगस्ट राेजी पंतप्रधानांनी बाेलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत, पाकव्याप्त काश्मीरही भारताचाच भाग आहे, अशी राेखठाेक भूमिका घेण्यात आली. अलीकडेच सार्क देशातील गृहमंत्र्यांची बैठक इस्लामाबादला झाली त्यात सहभागी हाेण्यासाठी राजनाथ सिंग गेले असता पाकिस्तानचे गृहमंत्री निसार अली खान चौधरी राजशिष्टाचार सोडून वागले.
बातम्या आणखी आहेत...