आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोन्यासाठी काही पण, व्यापाऱ्याच्या पोटात सापडली 12 लाखांची सोन्याची 12 बिस्किटे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पिण्याच्या पिण्याच्या बॉटलचे बुच पोटात गेल्याची तक्रार घेऊन आलेल्या चॉंदनी चौकातील व्यापाऱ्याच्या पोटात सोन्याची चक्क 12 बिस्किटे आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. 396 ग्रॅम वजनाच्या या सोन्याच्या बिस्किटांचे बाजारमुल्य चक्क 12 लाखांच्या घरात आहे.
पोटात अडकलेला धातू काढण्यासाठी चॉंदनी चौकातील एका व्यापारी खासगी रुग्णालयात गेला होता. पाणी पितांना पिण्याच्या पाण्याच्या बॉटलचे बुच पोटात अडकल्याचा दावा यावेळी त्याच्या कुटुंबीयांनी केला होता. परंतु, शस्त्रक्रियेनंतर वेगळीच बाब प्रकाशात आली. या व्यक्तीने सोन्याची बिस्किटे गिळली होती. तिही एक दोन नव्हे तर चक्क 12. यातील प्रत्येक बिस्किटाचे वजन 33 ग्रॅम आहे. दहा दिवसांपूर्वी हा व्यक्ती सिंगापूरला गेला होता. त्यावेळी त्याने ही बिस्किटे गिळून भारतात आणली होती. विमानतळावर सुरक्षेसाठी करण्यात येणाऱ्या चाचण्यांनाही या व्यापाऱ्याने आश्चर्यकारणपणे चुकविले होते.
बिस्किटे भारतात आणण्यासाठी या व्यापाऱ्याने गेल्या दहा दिवसांपासून जेवणही घेतले नव्हते. भारतात आल्यावर भरपूर पाणी किंवा थंडपेय घेऊन बिस्किटे नैसर्गिक मार्गाने शरीराबाहेर काढण्याची योजना होती. परंतु, बिस्किटे काही बाहेर आली नाही. उलट ती छोट्या आतड्यांमध्ये अडकून पडल्याने या व्यक्तीला पोटदुखीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत होती. त्यामुळे शेवटी त्याला रुग्णालयात यावे लागले. परंतु, येथे त्याचे घबाड उघडकीस आले.