आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोन्याच्या भावात 250 रुपयांची घसरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- डॉलरच्या दरात झालेली वाढ आणि देशांतर्गत ज्वेलर्सकडून मागणी घटल्यामुळे शनिवारी सोन्याच्या भावात पुन्हा एकदा घसरण नोंदवण्यात आली आहे. दिल्ली सराफा बाजारात सोने २५० रुपयांच्या घसरणीसह २८,९०० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले. चांदीच्या किमतीतही ८०० रुपयांची मोठी घसरण नोंदवण्यात आली. औद्योगिक क्षेत्रातून तसेच चांदीची नाणी तयार करणाऱ्या उद्योगाकडून चांदीची मागणी कमी झाल्याने चांदीच्या दरात घसरण झाली असल्याचे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे. या घसरणीसह चांदी ३८ हजार रुपयांच्या खाली येत ३७,४०० रुपये प्रति किलोग्रॅमच्या दराने विक्री झाली.
 
बातम्या आणखी आहेत...