नवी दिल्ली - सोने गेल्या सहा आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचले आहे. शुक्रवारी सोन्याच्या भावात सलग चौथ्या दिवशी वाढ नोंदवण्यात आली. दिल्ली सराफा बाजारात सोने दरात २०० रुपयांची वाढ नोंदवण्यात आली असून त्यामुळे सोने २९,४५० रुपये प्रति दहा ग्रॅमच्या दराने विक्री झाले. तर चांदीचे भाव ३०० रुपयांनी घसरले असून चांदी ४०,९५० रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचली आहे.