आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Good Actor Not Good Man, Amar Singh Critised On Bachchan

चांगला अभिनेता चांगला माणूस असेलच असे नाही, अमरसिंह यांची बच्चनवर टीका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - चांगला अभिनेता चांगला माणूस असेलच हे गरजेचे नाही. जेव्हा माझ्यावर संकट आले तेव्हा ते पळून गेले. दोन दशकांची जवळीक ते विसरले. एवढेच नाही तर अमिताभ यांना नेहरू परिवाराच्या चार दशकांच्या मैत्रीचेही विस्मरण झाले आहे, अशी डायलॉगबाजी एकेकाळी अमिताभ बच्चन यांचे मित्र राहिलेले अमरसिंह यांनी केली आहे.
आपल्या मैत्रीला तडे जाण्यास बिग-बी हेच जबाबदार असल्याचेही अमरसिंह यांनी म्हटले आहे. लंडनमधील एका टीव्ही वाहिनीशी बोलताना त्यांनी बिग-बी यांच्यावर टीका करण्याचे अचूक टायमिंग साधले. अमरसिंह नसते तर शतकाचा महानायक मुंबईच्या रस्त्यावर टॅक्सी चालवताना दिसला असता, असे अमिताभ यांनी म्हटले होते, याची आठवण अमरसिंह यांनी करून दिली. त्यांनी माझ्याबद्दल हे गौरवोद्गार काढले त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे, परंतु माझ्यावर वाईट दिवस आलेले असताना त्यांनी माझी साथ सोडली.
कोणाच्या बाजूने जातील
याचा काही नेम नाही
बिग-बी यांच्या निष्ठेसंबंधी सवाल उपस्थित करताना अमरसिंह म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी आदर व्यक्त करताना अमिताभ यांनी त्यांना वडिलांसमान असल्याचे म्हटले होते. आता बाळासाहेब हयात नाहीत. म्हणून ते राज ठाकरे यांच्यासोबत गेले आहेत. त्यांच्या पाठीला कणा नाही. गुजरातमध्ये ते नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहेत. यूपीमध्ये मुलायम यांच्यासोबत. ते कोणासोबत जातील याचा काही नेम नसतो.
वाईट दिवसांत
‘बिग-बी’ला साथ
अमिताभ यांच्या वाईट दिवसांत अमरसिंह यांनी त्यांना साथ दिली होती. एबीसीएल कंपनी नुकसानीमधून बाहेर पडण्यासाठी अटोकाट प्रयत्न करत होती तेव्हा त्यांनी अमिताभ यांच्याकडे मैत्रीचा हात केला होता.