आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीला पंतप्रधान मोदींकडून लवकरच मोठे गिफ्ट, नितीन गडकरींकडून खुलासा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोदी येत्या सहा महिनय्ता दिल्लीतील अनेक राजमार्गांचे उद्घाटन करतील असे गडकरी म्हणाले. - Divya Marathi
मोदी येत्या सहा महिनय्ता दिल्लीतील अनेक राजमार्गांचे उद्घाटन करतील असे गडकरी म्हणाले.
नवी दिल्ली - मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या भूमिपूजना पाठोपाठ आता राजधानी दिल्लीला पंतप्रधान मोठे गिफ्ट देणार असल्याचे नितीन गडकरींनी म्हटले आहे. केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी गुरुवारी म्हणाले, की येत्या सहा महिन्यात पंतप्रधान अनेक राजमार्गांचे उद्घाटन करुन दिल्लीकरांना मोठे गिफ्ट देणार आहेत. यामुळे दिल्लीकरांची जाम आणि प्रदुषणापासून सुटका होणार आहे. 
 
दिल्ली भाजप कार्यकारिणीच्या दोन दिवसीय बैठकीला संबोधित करताना गडकरींनी गेल्या दोन वर्षांत राजधानीत झालेल्या पायाभूत सुविधांची माहिती दिली. ते म्हणाले, मोदी सरकारने मुलभूत सेवा सुविधा पुरवण्यासाठी 40,000 कोटी रुपये उपलब्ध करुन दिले होते. येत्या सहा महिन्यात मोदी दिल्लीच्या नागरिकांना आणखी एक मोठे गिफ्ट देणार आहे. ते अनेक राजमार्गांचे उद्घाटन करतील. यामुळे दिल्लीतील ट्रॅफिक जाम आणि प्रदुषणाचा प्रश्न निकाली निघेल. 
 
गडकरी म्हणाले, राष्ट्रीय राजमार्ग क्रमांक 24चा मेरठच्या दिशेने विस्तार केला जाईल. यासाठी 6000 कोटी रुपये खर्च आपेक्षित आहे. विशेष म्हणजे यामध्ये सध्या गाजत असलेल्या गाजीपूर येथील डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याचा वापर होणार आहे. यामुळे स्थानिक लोकांचा मोठा त्रास कमी होणार आहे. 
 
बैठकीत दिल्ली भाजप अध्यक्ष मनोज तिवारींनी, डोकलाम वाद, तीन तलाक मुद्दा, जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधातील अॅक्शनवरुन पंतप्रधानांचे कौतूक केले. त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावरही हल्लाबोल केला.
बातम्या आणखी आहेत...