आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Goof Up At CRPF Jawan Funeral Procession, Hospital Shuns Body

शहिदांच्या अंत्ययात्रांवरून वादंग; हजारोंच्या उपस्थितीत जवानांना अखेरचा निरोप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - श्रीनगर हल्ल्यातील शहीद सीआरपीएफ जवानांच्या अंत्यसंस्कारावरून दोन ठिकाणी गोंधळ झाला. कर्नाटकात शहीद जवानाच्या अंत्ययात्रेत त्याच्या भावाचा फोटोने लावल्याने नातेवाईक तसेच उपस्थितांनी संताप व्यक्त केला तर उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री अखिलेश यादव येईपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाहीत, असा पवित्रा शहिदाच्या कुटुंबीयांनी घेतला आहे.

दरम्यान, तामिळनाडूतील मदुराई येथे पेरुमल आणि मध्य प्रदेशातील सिहोर जिल्ह्याच्या शहापुरा गावात शहीद जवान ओमप्रकाश मर्दानिया यांना सरकारी इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. मर्दानियाच्या अंत्यसंस्कारप्रसंगी भाजप नेत्या सुषमा स्वराज,मुख्यमंत्री शिवराज चौहान यांचीही उपस्थिती होती. मंड्या येथे एन. सतीश या सीआरपीएफ जवानाच्या अंत्ययात्रेत त्याचा भावाचा फोटो ठेवण्यात आल्याचा विचित्र प्रकार उजेडात आला.विशेष म्हणजे त्याचा भाऊ हासुध्दा सीआरपीएफ मध्येच आहे. सतीशचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी त्याच्या मूळ गावी अलामबाडी येथे आणण्यात आले होते. त्या वेळी हा प्रकार समोर आला. अखेरच्या प्रवासाला निघालेल्या सतीशचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.

त्या वेळी तेथे ठेवण्यात आलेल्या फोटोकडे कोणाचेही लक्ष गेले नाही. मात्र, ही बाब त्याच्या कुटुंबीयांच्या लक्षात आली. त्यानंतर फोटो कोणी ठेवला यावरून परस्परांवर आरोप-प्रत्यारोप करण्यास सुरुवात झाली. हे पोर्टेट सतीशचे नाही, ही चूक जिल्हा प्रशासनाची नाही, असा दावा मंड्याचे उपायुक्त बी. एन. कृष्णय्या यांनी केला आहे.

कुटुंबीय नाराज
श्रीनगरच्या हल्ल्यात एन. सतीशबरोबरच उत्तर प्रदेशातील अवध बिहारी सिंग हा जवानही शहीद झाला होता. माझ्या मुलाने देशासाठी प्राण दिले, परंतु मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना शहिदाची पत्नी उमा यांचे सांत्वन करण्यासाठी वेळ मिळत नसल्याचे अवध बिहारी सिंग याचे वडील रामकुमार यांनी सांगितले. मुख्यमंत्री जोपर्यंत कुथुरा बुजुर्ग गावात येणार नाहीत तोपर्यंत जवानावर अंत्यसंस्कार केले जाणार नाहीत, अशी भूमिका जवानाच्या कुटुंबीयांनी घेतली आहे. त्यात अवध बिहारीही होता. मुख्यमंत्र्यांनी सिंग यांच्या कुटुंबाला 20 लाख रुपयांची सानुग्रह मदत जाहीर केली आहे, परंतु सांत्वन करण्यासाठी कोणीही सरकारी प्रतिनिधी येथे फिरकलाही नसल्याने शहीद कुटुंबीय नाराज झाले आहेत.

रुग्णालयाचा नकार
शहीद सतीशचे पार्थिव बंगळुरूहून येथे आणताना मध्यरात्री 3 ते 6 या वेळेत शीतगृहात ठेवायचे होते. केवळ तीन तासांसाठी पार्थिव ठेवण्याची विनंती एका खासगी रुग्णालयास करण्यात आली होती, परंतु खासगी रुग्णालयाने पार्थिव ठेवण्यास नकार दिल्याची खळबळजनक माहितीदेखील हाती आली आहे. या प्रकरणात मंत्री ए. रामदास तसेच सुरेशकुमार यांनी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. रामदास यांनी सतीशच्या कुटुंबीयांसाठी 2 हजार 400 चौरस फुटांचा भूखंड देण्याचे आश्वासन दिले आहे.