आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आक्षेपार्ह शब्द, भाषेवर गुगल घालणार आळा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - गुगल आणि जी मेल वापरणार्‍यांसाठी ही बातमी धोक्याचा इशारा देणारी आहे. गुगलने अमेरिकेतील पेटंट ट्रेडमार्क ऑफिसमध्ये ‘पॉलिसी व्हायोलेशन चेकर’ नावाच्या सॉफ्टवेअरसाठी अर्ज दाखल केला आहे. या सॉफ्टवेअरच्या मदतीने गुगल आपल्या युर्जसवर करडी नजर ठेवणार आहे तसेच लोक गुगलवर काय लिहीत आहेत, हे या सॉफ्टवेअरच्या मदतीने पाहता येईल. या पेटंटसाठी हैदराबादचे मयंक तलाठी यांनीही संशोधक म्हणून अर्ज केला आहे.

आक्षेपार्ह शब्द हायलाइट
अलर्टमध्ये आक्षेपार्ह शब्द हायलाइट केले जातील. या शब्दांचा इतर कुणाशी संबंध असेल तर त्यालाही सूचना दिल्या जातील. हे पॉलिसी व्हायोलेशन चेकर सॉफ्टवेअर, हार्डवेअर किंवा कोणत्याही वैयक्तिक उपकरणाला लावले जाऊ शकते.

सॉफ्टवेअर कसे काम करेल?
गुगलचे हे ‘चेकर’ इलेक्ट्रॉनिक डाक्युमेंट्समधील आक्षेपार्ह शब्द किंवा वाक्ये ओळखेल. तसेच ज्या ई-मेलद्वारे धोरणांचे उल्लंघन होत आहे, त्यावरही चेकरचे लक्ष असेल.

असे शब्द जेव्हा गुगलवर वापरले जातील तेव्हा गुगलकडे याची माहिती जाईल. तेथे डाटाबेसमधील आधीपासूनच असलेल्या चिन्हांकित शब्दांशी हे शब्द जुळवून पाहिले जातील. आक्षेपार्ह शब्द आढळल्यास लिहिणार्‍याला तत्काळ अलर्ट जारी केला जाईल.

तुम्ही गुगलच्या नियमांचे पालन करत या सॉफ्टवेअरचा वापर केला तर स्वत:हूनच तुमच्या खासगीपणाचा अधिकार संपुष्टात आणाल. त्याचा वापर काळजीपूर्वक करायला हवा. पवन दुग्गल, सायबर तज्ज्ञ व ज्येष्ठ वकील