आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Google Blocks Child Adult Content From 100,000 Searches

बाल अश्लिल वेबसाईट्सः सर्वोच्‍च न्‍यायालय, गुगलने सर्च रोखून उचलले पहिले पाऊल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'चाईल्ड पॉर्नोग्राफी'ला आळा कसा घालता येईल, यासंदर्भात उपाययोजना सुचविण्‍याचे निर्देश सर्वोच्‍च न्‍यायालयाने दूरसंचार विभागाला दिले आहेत. तर, दुसरीकडे जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन गुगलने चाईल्‍ड पॉर्नोग्राफीसंबंधीत शोध ब्‍लॉक करण्‍यासाठी नवे तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्‍यामुळे 1 लाखांपेक्षा जास्‍त शोधांमध्‍ये अशा प्रकारचा मजकूर शोधकर्त्‍यांना दिसणार नाही.

पॉर्नोग्राफीक संकेतस्‍थळांना ब्‍लॉक करावे अशी मागणी करणारी एक जनहितयाचिका इंदूरमधील कमलेश वासवानी या वकिलाने दाखल केली आहे. जवळपास 20 कोटींहून अधिक पॉर्न क्लिप्स/ व्हिडिओ इंटरनेटवर सहज उपलब्ध आहेत. पॉर्न पाहणे हा गुन्हा नसला, तरीही पॉर्न दाखविणार्‍या संकेतस्थळांवर बंदी घालणे आवश्यक आहे. महिलांवर होणार्‍या अत्याचारांमागे पॉर्न हेदेखील एक कारण आहे, असा दावा या याचिकेत केला आहे. मुलांपर्यंत पोचणारा पॉर्नोग्राफीक कंटेंट अतिशय भडक आणि विकृत असतो. त्‍यामुळे मुलांच्‍या मनावर विपरित परिणाम होतो आणि भविष्‍यात संपूर्ण समाजाला धोका निर्माण होऊ शकतो, असे याचिकाकर्त्‍यांनी म्‍हटले आहे.

सविस्‍तर बातमी वाचण्‍यासाठी क्लिक करा पुढील स्‍लाईड्सवर...