नवी दिल्ली - जुन्या काळात बॉलिवूडचे ‘शो मॅन’ म्हणून ओळखले जाणारे सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते राज कपूर यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त ‘
गुगल‘ने डुडलच्या माध्यमातून रविवारी विशेष आदरांजली अर्पण केली. सन १९५१ मध्ये प्रेक्षकांना वेड लावणा-या ‘आवारा’ या चित्रपटातील राज कपूर यांचे चित्र वापरून गुगलने या शुभेच्छा दिल्या आहेत.
राज यांच्याच अविस्मरणीय ठरलेल्या ‘प्यार हुआ इकरार हुआ...’ या गीतातील नर्गिस दत्त यांच्यासोबतचे प्रसिद्ध चित्र डुडलमध्ये वापरण्यात आले आहे. चित्रपटातील हे युगूल एकाच छत्रीत असल्याचे हे दृश्य अनेक पिढ्यांना भावले होते. हे दृश्य डूडलच्या पार्श्वभूमीवर वापरण्यात आले होते.