आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Google Paid 544 Crore Bonus To Indian Man Neal Mahon

गुगलने 544 कोटींचा बोनस देत ट्विटरमध्ये जाण्यास रोखले या \'इंडियन\' टॅलेंटला!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयटी क्षेत्रात भारतीय मेंदूला तोड नाही हे बराक ओबामा यांनीही मान्य केले आहे. जगातील सर्वोत्तम व बड्या-बड्या कंपन्या इंडियन टॅलेंट्सला आपल्याकडे खेचण्यासाठी मागेल ती किंमत, पगार, पद देण्यासाठी तयार असतात. मात्र ज्यांच्याकडे टॅलेंट आहे व जे आयटी एक्सपर्ट ज्या कंपन्यांत काम करतात त्या कंपन्यांना अशा लोकांची खूपच काळजी घ्यावी लागते. अशाच एका टॅलेंटेड इंडियनला सगळ्यात मोठी इंटरनेट कंपनी गुगलला आपल्याच कंपनीत ठेवण्यासाठी तब्बल 544 कोटी रुपये बोनस द्यावा लागला आहे.
मूळ भारतीय असलेले व आता अमेरिकेचे नागरिक असलेले नील मोहन गुगलमध्ये जाहिरात उत्पादनाचे व्हाईसस प्रेसिडेंट म्हणून काम पाहतात. या नील मोहन यांना ट्विटरने प्रॉडक्ट चीफच्या पदाची ऑफर दिली होती. गुगल या टॅलेंटेड इंटरनेट जाहिरातीमधल्या एक्सपर्ट हि-याला कोणत्याही स्थितीत सोडू इच्छित नव्हती. तसेच नील मोहन ट्विटरमध्ये जावू नये या भीतीने गुगलने मोहन यांना 100 मिलियन डॉलरचा बोनस दिला. भारतीय चलन रुपयात याची किंमत 544 कोटी रुपये होती.
पुढील स्लाईड्सवर पाहा, या इंडियन-अमेरिकन बनलेल्या व गुगलसाठी महत्त्वपूर्ण ठरणा-या नील मोहन व त्याच्या करिअरविषयी....