आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. अब्दुल कलाम यांना ‘गुगल’चीही आदरांजली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या निधनाने सबंध देश दुख:सागरात असताना लोकप्रिय सर्च इंजिन गुगलनेही आपल्या होमपेजवर काळ्या रंगाची रिबन दाखवून आदरांजली वाहिली आहे.

डॉ. कलाम यांचे सोमवारी निधन झाले. त्यानंतर देशभर शोक व्यक्त करण्यात येत आहे. सोशल मिडियाही डॉ. कलाम यांच्या निधनानंतर हळहळला. फेसबुक, ट्विटर, तसेच व्हॉटस्अॅपद्वारे कलाम यांचे विचार, त्यांची छायाचित्रे आणि त्यांच्या भाषणांचे व्हिडिओ परस्परांना शेअर करण्यात येत आहेत. बुधवारी गुगलनेही आपल्या होमपेजवर सर्च बटनच्या खाली काळ्या रंगाच्या रिबनचे चित्र दाखवून डॉ. कलाम यांना आदरांजली वाहिली आहे.

डॉ. कलाम प्रेरणास्रोत : अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनीही डॉ. कलाम यांच्या भारतीय तंत्रज्ञान विकासातील योगदानाबद्दल गौरव करून हे महान व्यक्तिमत्त्व समस्त भारतीयांसाठी प्रेरणा स्रोत होते, अशा शब्दांत शोक व्यक्त केला.

टि्वटर अकाऊंट सुरूच राहणार : डॉ. कलाम यांच्यासोबत काम केलेल्या, त्यांचा वडिलकीच्या नात्याने कायम सल्ला घेणा-या सहका-यांनी त्यांचे ट्विटर अकाऊंट सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हे अकाऊंट आता ‘इन मेमरी ऑफ डॉ. कलाम’ या नावाने सुरू ठेवले. येणार आहे.

पाकिस्तानी शास्त्रज्ञाला पोटशूळ
पाकमधील प्रसिद्ध शास्त्रज्ञ ए. क्यू. खान यांना मात्र डॉ. कलाम यांच्या लोकप्रियतेबद्दल पोटशूळ उठला आहे. त्यांनी डॉ. कलाम यांच्या भारतातील कार्याचा गौरव करण्याऐवजी त्यांना सामान्य ठरवले. यामुळे भारतीयांमध्ये तीव्र संताप पसरला आहे.