आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोर्नोग्राफिक साइट्सची यादी पोलिसांना गुगल सोपवणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - बाल लैंगिक शोषणाला आळा घालण्यासाठी गुगल सर्च इंजिनने पुढाकार घेतला आहे. इंटरनेटवर बाल लैंगिक शोषणाच्या चित्रफिती तसेच छायाचित्रे दाखवणा-या संकेतस्थळांची यादी गुगल पोलिसांना उपलब्ध करून देणार आहे.


पोलिसांसोबत ही यादी पोर्नोग्राफीविरोधी मोहीम चालवणा-या संघटना, तसेच इतर कंपन्यांनाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. अशा प्रकारच्या प्रत्येक छायाचित्राला एक विशिष्ट प्रकारचे चिन्ह दिले जाणार आहे. त्यामुळे अशी छायाचित्रे कॉपी करून घेतली तरी त्यांचा छडा लावता येणार आहे. हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी गुगल 70 लाख डॉलर्स खर्च करणार आहे.


इंटरनेट वॉच फाउंडेशनने दिलेल्या माहितीनुसार ही योजना काही देशांत एकाच वेळी कार्यरत असेल. संपूर्ण जगभरातील विविध संघटना व संस्थांच्या सहकार्याने ही योजना कार्यान्वित केली जाणार आहे.