आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अलविदा ‘ऑर्कुट’ !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशातील पहिली सोशल नेटवर्किंग साइट असलेल्या ऑर्कुटची सेवा 30 सप्टेंबर रोजी बंद होणार आहे. इंटरनेट आणि सोशल मीडियाची जादू निर्माण करणार्‍या या संकेतस्थळाने दहा वर्षे पूर्ण केली. त्यानंतर आता ते बंद करण्यात येणार असल्याचे गुगलने मंगळवारी जाहीर केले. ऑर्कुट या संकेतस्थळाची मालकी गुगलकडे आहे.

ऑर्कुट भारत आणि ब्राझीलमध्ये सर्वाधिक लोकप्रिय संकेतस्थळ मानले जाते. परंतु जगातील इतर भागात ही सेवा फारशी चांगल्या प्रकारे चालत नव्हती. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या दहा वर्षांत यू-ट्यूब, ब्लॉगर, गुगल प्लस यांनी युजरला अनेक चांगले पर्याय उपलब्ध करून दिले. त्यामुळे ही सेवा बंद करण्यात आली आहे, असे ऑर्कुटने ब्लॉगवरून जाहीर केले. त्यामुळे यापुढे ऑर्कुटचे अकाउंट बंद होणार आहे. परंतु त्यावरील प्रोफाइल, अर्काइव्ह, कम्युनिटीजची माहिती साठवली जाणार आहे. त्यामुळे ऑर्कुट युजरला घाबरून जाण्याची गरज नाही, असे गुगलकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तुम्हाला पोस्ट किंवा कम्युनिटी अर्काइव्ह हवी नसेल तर तुम्ही गुगल अकाउंटवरून ऑर्कुटला कायमचे काढून टाकू शकता.

फेसबुकची लोकप्रियता वाढली ?
गेल्या दहा वर्षांत फेसबुकची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. जगभरात फेसबुकचे 1.28 अब्ज युर्जस आहेत. 2010 मध्ये फेसबुकने ऑर्कुटला मागे टाकताना सोशल नेटवर्किंग साइटच्या यादीत अव्वल स्थान मिळवले. त्यावर्षी भारतात फेसबुकला व्हिजिट देणार्‍या युजरची संख्या 2 कोटींहून अधिक होती. तुलनेने ऑर्कुट मात्र पिछाडीवर होते.
- 2004 मध्ये ऑर्कुटची सुरुवात झाली होती. त्याच वर्षी फेसबुकचीदेखील स्थापना झाली होती.

- ऑर्कुटचे युर्जस
ब्राझीलमध्ये ऑर्कुटचे 50.6 टक्के, तर भारतात 20.44 टक्के, अमेरिका-पाकिस्तानातील हे प्रमाण अनुक्रमे 17.78 व 0.86 टक्के आहे.

(फोटो - संग्रहित छायाचित्र)