आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Google To Assist Narendra Modi To Develop Varanasi

वाराणसीला ऐतिहासिक नॅशनल हब बनविण्यासाठी मोदींना गुगल करणार मदत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - वाराणसी लोकसभा मतदारसंघातून विक्रमी मतांनी विजयी झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक नॅशनल हब बनवून वाराणसीच्या नागरिकांचे आभार मानू इच्छितात. मोदींनी या कामाला सुरवात देखील केली आहे. या प्रकल्पासाठी मोदींना गुगल मदत करत आहे. त्यासोबतच काही प्रोफेशनल्स आणि कन्सल्टंट देखील वाराणसी आणि आसपारसच्या परिसरात प्रेक्षणीय स्थळांचा शोध घेत आहेत आणि सुरक्षेच्या दृष्टीने शहराचा नकाशा तयार करत आहेत.
मोदींनी मे मध्ये वाराणसीच्या विकासाची घोषणा केली होती. त्यानंतर अनेक कंपन्या त्यांचे प्रस्ताव घेऊन सरकारकडे गेले आहेत. तर, काहींनी मोदींच्या टीमशी चर्चा देखील केली आहे. गेल्या महिन्यात फेसबुकच्या चीफ ऑपरेटिंग ऑफिसर शेरल सँडबर्ग भारत दौर्‍यावर आल्या होत्या तेव्हा मोदींनी त्यांच्यासोबत या प्रोजक्टमध्ये सोशल मीडियाच्या सहभागावर चर्चा केली होती.
गुगलने अद्याप वाराणसी प्रोजेक्टबद्दल अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र, प्रवक्त्याने सांगितले आहे, की पुरातत्व विभागाच्या सहयोगाने आम्ही भारतातील राष्ट्रीय स्मारकांना ऑनलाइन आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत.
मोदींसोबत दोन बैठकांमध्ये सहभागी राहिलेल्या एका व्यक्तीने सांगितले, वाराणसीचे ऐतिहासिक आणि पौराणिक स्वरुप जैसे-थे ठेवून मोदी शहराचा विकास करु पाहात आहेत.