आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Google Will Launch New Fast Search Engine For Slow Internet, Divya Marathi

स्लो इंटरनेटवरही करा फास्ट सर्च ! गुगल नवी वेगवान प्रणाली आणणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मोबाइल इंटरनेट वापरणा-या भारतीय ग्राहकांना कमी गतीच्या इंटरनेट जोडणीवरही वेगाने सर्च करण्यासाठी गुगल नवी वेगवान प्रणाली उपलब्ध करून देणार आहे.
गुगलने आपल्या सर्च रिझल्ट पेजची नवी आवृत्ती विकसित केली असून मोबाइलवर इंटरनेट वापरणा -या व्यक्तीकडे इंटरनेटची स्लो इंटरनेट जोडणी असेल तर त्याची माहिती आपोआप गुगल सर्व्हरपर्यंत जाईल. त्यानुसार संबंधिताला फास्ट सर्च रिझल्ट मिळू शकेल.
भारतात प्रामुख्याने स्मार्टफोनवर इंटरनेटचा अधिक वापर केला जातो. मात्र, यातील बहुतांश मोबाइल कमी क्षमतेचे असतात. अशा मोबाइलधारकांना फास्ट रिझल्ट मिळावेत हा गुगलचा उद्देश असल्याचे कंपनीचे नामांकित सॉफ्टवेअर इंजिनिअर भारत मेदिरट्टा यांनी ब्लॉगस्पॉटवर म्हटले आहे. अगदी मोजके बाईट ट्रान्सफर जरी वाढले तरी मोबाइलधारकांसाठी ती खूप महत्त्वाची ठरेल असे त्यांनी म्हटले आहे.

असे मिळतील फास्ट रिझल्टस्
मोबाइलवर सर्च करणा-यांसाठी जी उच्च दर्जाची यंत्रणा आहे त्यात कंपनी कोणताही बदल करणार नाही. मात्र, कमी क्षमतेच्या मोबाइलवर ही सेवा वापरणा -यांसाठी सर्च रिझल्टमध्ये प्रतिमा किंवा नकाशे आवश्यक असतील तरच दाखवले जातील. त्यामुळे डाऊनलोड फास्ट होईल व मोबाइलधारकांना फास्ट रिझल्ट मिळू शकतील.

प्रादेशिक भाषांचे पर्याय
प्रादेशिक भाषांमध्ये सर्च करणा-यांना सहजपणे अधिकाधिक माहिती उपलब्ध होण्याच्या दृष्टीने अधिक पर्याय उपलब्ध करून देण्यावर गुगलचा भर असून व्हॉईस सर्चसारखी सुविधा भारतात सुरू करण्यावरही कंपनीचा भर आहे.