आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यूदंडाची शिक्षा अयोग्य, ही माझी भूमिका आहे; शिवसेनेच्या आरोपांना गोपाल गांधींचे उत्तर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महात्मा गांधी यांना वंदन करताना गोपालकृष्ण गांधी. - Divya Marathi
महात्मा गांधी यांना वंदन करताना गोपालकृष्ण गांधी.
नवी दिल्ली- 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनच्या फाशीला विरोध केल्याबद्दल यूपीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार गोपालकृष्ण गांधी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. शिवसेनेने यूपीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार गोपालकृष्ण गांधी यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
 
याकूबला फासाच्या तख्तापासून वाचवण्यासाठी ज्यांनी आपली सर्व शक्ती पणाला लावली होती. अशा व्यक्तीला उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी देणे ही कोणती मानसिकता आहे? अशा व्यक्तीला तुम्ही उपराष्ट्रपती बनविणार आहात का?' असा प्रश्न शिवसेनेने यूपीएला विचारला होता. यावर गोपाल गांधी यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.

गोपाल गांधी म्हणाले
- मृत्यूदंडाची शिक्षा ही मध्ययुगीन मानसिकतेचे प्रतिक आहे. तसे करणे चुकीचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी हे माझे प्रेरणास्थान आहे. गांधी आणि आंबडेकर हे मृत्यूदंडाच्या शिक्षेच्या विरोधात होते. याकूबने जशी दया याचिका केली होती तशीच दया याचिका कुलभूषण जाधवनेही केली आहे. कुलभूषण जाधव यांच्या फाशीला माझा विरोध आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...