आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खर्चाची कबुली मुंडेंना पडणार महागात, खासदारकी होऊ शकते रद्द

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/मुंबई - गेल्या लोकसभा निवडणुकीत आठ कोटी खर्च केल्याचे विधान भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांना भलतेच ‘महागात’ पडण्याची शक्यता आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी याबाबत चौकशी करावी, अशी आक्रमक मागणी केल्यानंतर निवडणूक आयोगानेही प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. निवडणूक आयोगाकडून मुंडेंना लवकरच नोटीस पाठविणार आहे. आयोगाने कारवाई केल्‍यास मुंडेंची लोकसभा सदस्‍यत्त्व रद्द होऊ शकते. तसेच त्‍यांच्‍यावर निवडणूक लढविण्‍यास बंदीही घालण्‍यात येऊ शकते.

आम आदमी पार्टीनेही मुंडेंची प्राप्‍तीकर खात्‍याकडून चौकशी करण्‍याची मागणी केली आहे.

दुसरीकडे मुंडे यांनी याप्रकरणी सारवासारव करायला सुरुवात केली आहे. माझे वक्तव्‍य सर्वसमावेशक होते. निवडणुकीच्‍या एकूण खर्चाबद्दल बोललो होतो, असे मुंडेंनी म्‍हटले आहे. भाजपनेही मुंडेंची सारवासारव करण्‍याचा प्रयत्न केला आहे. प्रदेशाध्‍यक्ष देवेंद्र फडणवीस म्‍हणाले, निवडणुकीत काळ्या पैशाचा वापर वाढत असल्‍याकडे मुंडेंनी लक्ष वेधले होते. त्‍यांचे वक्तव्‍य एकूणच निवडणुकीच्‍या खर्चांबाबत होता. त्‍यात त्‍यांच्‍या एकट्याच्‍या खर्चाबाबत मत नव्‍हते. तरीही कोणत्‍याही चौकशीचे स्‍वागतच आहे.