आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोपीनाथ मुंडे हे नीतिमत्ता असलेली व्यक्ती - पासवान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सामान्य माणसासाठी कणव असलेले आणि नितीवान विचाराने आयुष्य जगणारे गोपीनाथ मुंडे हे चालती बाेलती संस्था होते, अाजही क्षणाेक्षणी त्यांची अाठवण हाेते अशी भावना केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी व्यक्त केली. दिवंगत नेते गाेपीनाथ मुंडे यांच्या पहिल्या स्मृती दिनानिमित्त महाराष्ट्र सदनात अायाेजित कार्यक्रमात ते बाेलत हाेते. यावेळी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, खासदार चंद्रकांत खैरे, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस श्याम जाजू, भाजपच्या महिला माेर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर, निर्लेप कंपनीचे प्रमुख राम भोगले अादी उपस्थित हाेते.
पासवान म्हणाले, गोपीनाथ मुंडे यांनी समाजातील उपेक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले हाेते. ते देशाचे नेते होते राजकारणात दुर्मिळ असणारी नितीमत्ता आणि विचारधारा घेवून त्यांनी सतत कार्य केले त्यामुळच ते एक चालते फिरते संस्था हाेते. जावडेकरांनी आपल्या भाषणात मुंडे हे उत्तम संघटक आणि लढवय्ये नेते आणि समाजमन अाेळखणारे उमदे नेतृत्व असल्याचे सांगितले. खासदार खैरे, श्याम जाजू, विजया रहाटकर यांनीही गाेपीनाथ मुंडे यांच्या स्मृतींना उजाळा दिला. मुंडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ महाराष्ट्र सदनात पासवान, जावडेकर व अन्य पाहुण्यांच्या हस्ते वृक्षाराेपण करण्यात अाले. महाराष्ट्र सदानचे सहायक व्यवस्थापक प्रमाेद काेलपते यांनी सूत्रसंचालन केले. माहिती
विभागाचे उपसंपादक रितेश भुयार यांनी आभार मानले.
बातम्या आणखी आहेत...