आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाकड गाईंना सरकार देणार मोफत चारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- ईंनी दूध देणे बंद केल्यानंतर शेतकऱ्यांनी त्या विक्रीला काढू नये म्हणून केंद्र सरकार अशा गाईंसाठी शेतकऱ्यांना मोफत चारा पुरवठा करण्याच्या योजनेवर विचार करत आहे, अशी माहिती केंद्रीय वनमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.

केंद्रीय कृषी मंत्रालय आणि राष्ट्रीय गोधन महासंघाच्या वतीने गोसंवर्धनावर आयोजित परिषदेत बोलताना जावडेकर म्हणाले, भाकड गाईंची शेतकऱ्यांनी निगा राखावी व जंगलात त्या सोडल्याने होणारे नुकसान टाळता यावे म्हणून भाकड गाईंना मोफत चारा पुरवण्याची योजना आहे. गाय दुभती असेपर्यंतच शेतकरी त्यांना चारा घालतात. परंतु तिचे दूध बंद झाले की आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने तिला खाटकांच्या हवाली करतात, असे जावडेकर म्हणाले.

मनरेगाअंतर्गत चारा लागवड : मनरेगाअंतर्गत वन क्षेत्रात चारा घेऊन तो त्या परिसरातील शेतकऱ्यांना मोफत देण्याचाही विचार आहे. ही योजना लवकरच अमलात आणली जाईल, असे जावडेकर म्हणाले.