आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Government Awarded To Civic Award To Lalkrushna Adwani, Amitabh Bachchan, Etc

अडवाणी, अमिताभ, भटकर, दिलीपकुमार, बिल गेट्स यांना पद्म पुरस्‍कार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, अभिनेता दिलीपकुमार आणि अमिताभ बच्चन तसेच पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्यासह ९ मान्यवरांना या वर्षी पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर, मायक्रोसाॅफ्टचे प्रमुख बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मिलिंडा गेट्स, पत्रकार रजत शर्मा, स्वपन दासगुप्ता यांच्यासह २० जणांना पद्मभूषणने गौरविण्यात आले. प्रसून जोशी, संजय लीला भन्साळी, रवींद्र जैन, डॉ. प्रल्हाद, शेखर सेन, ज्ञान चतुर्वेदीसह ७५ जणांना यंदा पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले आहे.
यंदा १०४ जणांना सन्मानित करण्यात येत आहे. त्यात १७ महिला आणि एनआरआय, पीआयओ आणि विदेशी श्रेणीतील १७ जणांचा समावेश आहे.
पद्मविभूषण (९) : लालकृष्ण आडवाणी, दिलीप कुमार, अमिताभ बच्चन, प्रकाशसिंग बादल, डी. वीरेंद्र हेगडे, रामनंदाचार्य स्वामी रामभद्राचार्य, प्रो. एम. रामास्वामी श्रीनिवासन, के. वेणुगोपाल,

पद्मभूषण (20) : डॉ. विजय भटकर, जेहान बरुआ, स्वपन दासगुप्ता, स्वामी सत्यमित्रानंद गिरी, एन. गोपालस्वामी, सुभाष कश्यप, डॉ. पं. गोकुलोत्सव जी महाराज, अंबरीश मित्तल, सुधा रघुनाथन, हरीश साळवे, अशोक सेठ, रजत शर्मा, सतपाल, शिवकुमार स्वामी, खडगसिंग वलदिया, प्रो. मंजूल भार्गव (एनआरआय-अमेरिका),

पद्मश्री (७५) : मंजुला अनागनी, एस. अरुणन, के. अवसरला, डॉ. बेट्टिना शारदा बौमेर, नरेश बेदी, अशोक भगत, संजय लीला भन्साळी, लक्ष्मी नंदन बोरा, ज्ञान चतुर्वेदी, प्रो. डॉ. योगेश कुमार चावला, जयाकुमारी चिक्कला, विवेक देबोरॉय, सरुंगबम वमिला कुमारी देवी, अशोक गुलाटी, रणदीप गुलेरिया, के.पी. हरिदास, राहुल जैन, रवींद्र जैन, सुनील जोगी, प्रसून जोशी, प्रफुल्ल कार, सबा अंजुम, उषाकिरण खान, राजेश कोटेचा, अलका कृपलानी, डॉ. हर्षकुमार, नारायण पुरुषोत्तम मलाया, लॅम्बर्ट मॅस्करेन्हास, डॉ. जे. मॅक्गिलिगन, वीरेंद्र मेहता, तारक मेहता, नील हरबर्ट नॉन्गकिंरिह, चेवांग नॉरफेल, टी. व्ही. मोहनदास पई, तेजस पटेल, जादव मोलई पेयांग, बमिला पोद्दार, एन. प्रभाकर, डॉ. प्रल्हाद, डॉ. नरेंद्र प्रसाद, रामबहादूर राय, मिताली राज, पी.व्ही. राजारमन, जेएस राजपूत, कोटा श्रीनिवास राव, प्रो. वमिल रॉय, शेखर सेन, गुणवंत शाह, ब्रह्मदेव शर्मा (भाई जी), मनू शर्मा, प्रो. योगराज शर्मा, वसंत शास्त्री, एसके शिवकुमार, पीव्ही. सिंधू, सरदारा सिंह, अरुणिमा सिन्हा, महेश राज सोनी, डॉ. निखिल टंडन, एच. थेगसे रिंपोचे, डॉ. हरगोविंद लक्ष्मीशंकर त्रिवेदी, सय्यदना मोहंमद बुरहानुद्दीन (मरणोत्तर), ज्यां क्लाउद कैरियेर (फ्रांस), डॉ. नंदराजन राज शेट्टी (एनआरआय-अमेरिका), जगदगुरू अमृत सूर्यनंद महाराज (एनआरआय-पोर्तुगाल), मीठालाल मेहता (मरणोपरांत), तृप्ती मुखर्जी (एनआरआय-अमेरिका), रघुराम पिल्लरीसेट्टी (एनआरआय-अमेरिका), सौमित्र रावत (एनआरआय-ब्रिटेन) प्रो. एनेट श्मिडेशेन (जर्मनी), प्राण कुमार शर्मा (प्राण) (मरणोत्तर),आर. वासुदेवन (मरणोत्तर)